अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- काही महिलांना रात्रीही ब्रा घालून झोपायची सवय असते. रात्री ब्रा घालून झोपल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
1) जखम : ब्रा घालून झोपल्याने त्याचे हुक आणि स्ट्रिप्समुळे त्वचेला हानी पोहोचून शकते. नेहमी ब्रा घालून झोपायची सवय असल्यास त्वचेवर एखादी जखम होऊ शकते
2) सौंदर्याला बाधा : ब्रा घालून झोपल्यास महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच, यातून अनेक अजारही उद्भवन्याचीही शक्यता असते. तसेच, स्त्रियांच्या नैसर्गीक सौंदर्याला बाधाही येण्याची शक्यता असते.
3) ऍलर्जी : दिवस-रात्र ब्रा वापरल्याने त्वचेवर लाल-पांठऱ्या रंगाचे ठसे उटतात. तसेच, अनेकदा या ठिकाणी घाम आल्यास ऍलर्जीही होऊ शकते.
4) कॅन्सरची गाठ : तुम्ही रात्री झोपताना नेहमी टाईट ब्रा घालून झोपत असाल तर, तुमच्या स्तनांमध्ये कॅन्सरची गाठ होण्याची भीती वाढते. एका रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे, ही गोष्ट सिद्ध झाली आहे.
5) स्नायूंना नुकसान : वायर मटेरियल किंवा टाइट स्पोर्ट्स ब्रा घातल्याने आपल्या स्तनाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकते
6) रेशेस :नाजुक त्वचेवर लाल डाग येणे किंवा त्या भागात खाज येणे, जळजळ होणे, हे सर्व रात्री ब्रा घालण्याचे परिणाम असू शकतात. मुख्यतः: रात्री ब्रा घालून झोपणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.
7) अपुरी झोप : तुम्हाला रात्री टाईट ब्रा घालून झोपल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. असं झालं तर अर्थातच त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. तुमची झोप मध्येमध्ये तुटते आणि झोप पूर्ण होत नाही.
(टीप : हि पोस्ट अश्शील नसून आरोग्याविषय महत्वाची माहिती असणारी आहे )
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com