मधुमेह टाळण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली रक्तातील साखर अनियंत्रित झाली की मधुमेहाचा त्रास होता. बदलती जीवनशैली, बैठी कामे, फास्ट फूडचे प्रमाण, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचे प्रमाण जास्त वाढले आहे. मधुमेहींना बाकीचे आजार होतात कारण त्यांची प्रतिकार क्षमता कमी झालेली असते.

१. सातत्याने शारीरिक हालचाली सुरू ठेवा : नृत्य करणे, खेळणे, भरभर चालणे यामुळे टाईप टू डायबेटीसची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते.

प्रत्येक जेवणानंतर १५ मिनिटे चालले पाहिजे. व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि ब्लड शुगरचे प्रमाण चांगले राखले जाते.

२. समतोल आहार : मधुमेह टाळण्यासाठी आरोग्यदायी आहार आवश्यक आहे. विशेषतः तंतूमय पदार्थांनीयुक्त अन्न खावे. तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळावेत.

३. पुरेशी झोप: किमान सात ते आठ तास झोप घेतल्याशिवाय माणसाला उत्साह वाटत नाही. झोप शांत लागावी यासाठी मनःस्थिती योग्य ठेवावी.

४. तणाव टाळावा – तणाव हे डायबेटीसचे सर्वात मोठे कारण आहे. केवळ डायबेटीसच नव्हेतर इतरही अनेक विकार तणावामुळे होत असतात. म्हणून कोणत्याही गोष्टीची फार हाव धरून नये.

५. व्यसनांपासून दूर रहा – सिगारेट, दारू किंवा अन्य कोणतेही नशिले पदार्थ सेवन करण्याची सवय असेल तर ती सोडली पाहिजे.

अहमदनगर लाईव्ह 24