Home Gardening Tips:- घरामध्ये किंवा घराच्या बगीच्यात आपण वेगळ्या प्रकारच्या सजावटीचे आणि आकर्षक असणारे फुलझाडे लावतो. यापुढे झाडांमध्ये अनेक प्रकारच्या वेलींचा देखील समावेश असतो. घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि घरामध्ये उत्साहवर्धक आणि प्रसन्न वातावरण राहण्याच्या दृष्टिकोनातून अशा लावलेल्या झाडांचे किंवा वेलीचे खूप मोठे सकारात्मक परिणाम दिसून येतात.
बऱ्याचदा आपण घराच्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीवर देखील कुंड्यामध्ये वेगळ्या प्रकारचे फुलझाडे किंवा आकर्षक दिसणाऱ्या वेलींचे रोपटे लावत असतो. तसे पाहायला गेले तर प्रत्येक प्रकारचे फुलझाडे असो किंवा वेल असो त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे व्यक्तीला होत असतात. फुल झाडांमध्ये आपण गुलाबाच्या फुलांपासून तर चाफा, चमेली सारख्या अनेक प्रकारचे फुल झाडांची लागवड करतो.
परंतु या सर्वांमध्ये जर आपण मनी प्लांट या वेलीचा विचार केला तर घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी याचे खूप महत्त्व आहे. मनी प्लांटचा वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मनी प्लांट जर तुम्ही घरी लागवड करत असाल किंवा घराच्या परिसरात लावत असाल तर तुमच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा खूप चांगला प्रभाव पडतो.
मनी प्लांटच्या वेलीमुळे किंवा झाडामुळे घरातील पैशांच्या अडचणी कमी होतात असं देखील एक म्हटले जाते. परंतु मनी प्लांटच्या वेलीमध्ये अनेक प्रकार असून त्यापैकी कोणते लावल्याने जास्त फायदा होतो हे आपल्याला माहीत असते. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण मनी प्लांट चे विविध प्रकार व त्या प्रकारांचे फायदे जाणून घेणार आहोत.
घरी लावण्यासाठी सर्वात्तम मनी प्लांटचे प्रकार
1- गोल्डन मनी प्लांट– हा मनी प्लांट चा अतिशय फायदेशीर असा प्रकार असून याची कमीत कमी देखभाल करावी लागते. ज्या व्यक्तींचा बीझी शेड्युल असतो किंवा रोपांची काळजी व्यवस्थितरित्या घ्यायला वेळ नसेल अशा व्यक्तींनी घरामध्ये गोल्डन मनी प्लांट लावावा. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला आकर्षक दिसतोच परंतु हवा शुद्ध करण्याचा याचा गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे.
2- ग्रीन मनी प्लांट– ग्रीन मनी प्लांट ची लांबी वीस मीटर पर्यंत असू शकते. त्यामध्ये देखील हवा शुद्ध करण्याची क्षमता असून हवेमध्ये फार्मल्डीहाईड, बेंझीन आणि जाईलीन सारखे हानीकारक असलेले प्रदूषके काढून टाकण्यासाठी मदत करतो.
3- जेड मनी प्लांट– या मनी प्लांटचे चिन संस्कृतीमध्ये महत्त्व असून या संस्कृतीमध्ये जेड मनी प्लांट नसीब, समृद्धी आणि संपत्ती आणते असे म्हटले जाते. तसेच या प्रकाराला मनी ट्री किंवा लकी प्लांट म्हणून देखील ओळखले जाते. या प्रकाराच्या मनी प्लांटचा वापर हा प्रामुख्याने कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्राला शुभेच्छा देण्यासाठी भेट म्हणून दिले जाते.
मनी प्लांटचे इतर प्रकार
1- गोल्डन पोथोस– हा एक सर्वाधिक लोकप्रिय प्रकार असून या प्रकाराच्या मनी प्लांटची पाने हृदयाच्या आकारासारखे असून ज्यांचा रंग पिवळा किंवा सोनेरी असतो. कमीत कमी प्रकाशामध्ये देखील मनी प्लांटचा हा प्रकार चांगला वाढतो. या मनी प्लांटचा जो काही रंग आहे त्याप्रमाणे आपले नशीब देखील सोन्यासारखे होईल अशी एक समज आहे.
2- निऑन पोथोस– हा एक मनी प्लांटचा महत्त्वाचा प्रकार असून त्याची पाने चमकदार हिरवे आणि जवळजवळ फ्लोरोसेंट रंगाचे असतात. हे कार्यालयामध्ये किंवा बेडरूम मध्ये लावण्यास योग्य मानले जाते.
3-सॅटिन पोथोस– या झाडाची पाने सिल्वर हिरव्या रंगाचे असतात व याचा मखमली पोत असल्यामुळे स्पर्शाला खूप मऊ असतो.
मनी प्लांट लावल्यामुळे काय होतात फायदे?
1- अँटी रेडिएटर म्हणून उपयुक्त– घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये जर मनी प्लांट लावले असेल तर संगणक आणि मोबाईल मधून जे काही हानिकारक किरणोत्सार्गे उत्सर्जित होतात ते शोषून घेण्याचे काम मनी प्लांट च्या माध्यमातून केले जाते.
2- औषधी गुणांनी समृद्ध– घरामध्ये जर वाय-फाय राऊटर असेल तर त्याच्याजवळ मनी प्लांट ठेवणे हे कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते. मनी प्लांट घरातील वाय-फाय रेडिएशन कमी करण्यास मदत करते व मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. तसेच ज्या वयस्कर लोकांना हृदयाचा त्रास आहे त्यांना देखील फायदेशीर आहे.
3- फिश टॅंक मधील पाणी स्वच्छतेसाठी फायद्याचे– जर तुम्ही मनी प्लांटची मुळे आणि पाने फिश टॅंक वर ठेवून मनी प्लांटच्या रोपाला फिश टॅंकवरती वाढवले तर फिश टॅंक मधील पाण्यात जो काही नाईट्रेट असतो तो काढून टाकण्यास यामुळे मदत होते व फिश टॅंक मधील मासे जास्त काळ जगतात.
4- संपत्ती व समृद्धी वाढवण्यासाठी उपयुक्त– मनी प्लांट बद्दल असे मानले जाते की घरामध्ये मनी प्लांट लावले तर आर्थिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती होते. मनी प्लांट ला समृद्धीचे व सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
5- घरातील हवा शुद्ध करण्यासाठी फायदेशीर– मनी प्लांटची वेल घरात लावल्यामुळे घरातील हवा शुद्ध करण्यास खूप मोठी मदत होते. त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ होते व त्याचा आरोग्यावर देखील खूप सकारात्मक परिणाम होतो.