होंडाची ‘ही’ लोकप्रिय बाईक नव्या रूपात ! कधी होणार लॉन्च, काय असतील फिचर्स? जाणून घ्या…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-होंडा कंपनी नेहमीच काहीतरी वेगळे आणि अधिक फायदेशीर बाईक निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या विविध गुणांमुळे ही कंपनी बाइकप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.

आता होंडा तिची जुन्या काळातील लोकप्रिय मोपेड गाडी नव्या अंदाजात, नव्या ढंगात मार्केटमध्ये आणणार आहे. कंपनीने कॉन्स्पेट बाइक CT125 2019 मध्ये लॉन्च केली होती.

आता होंडाने नव्या ढंगातील CT125 साठी हालचाल सुरू केली आहे. या मोपेडसाठी पेटेंट मिळवण्यास अर्ज दाखल केला. परंतु, या मोपेडची माहिती लिक झाली आहे. या वर्षी मार्च महिन्यात कंपनीने अर्ज भरला आहे.

Honda CT125 Hunter Cub (होंडा CT125 हंटर कब) असं या मोपेडचे नाव आहे. सुपर कबचा लूक हा क्लीन आहे आणि बाइकमध्ये लावण्यात आलेल्या केबल दिसून येतात. तर Hunter Cub मध्ये संपूर्ण उलट प्रकार आहे. तुर्तास होंडा या बाइकला पुढील वर्षी जपानमध्ये लाँच करणार आहे.

* काय आहेत फीचर्स ?:-

  • १) इंजिन- Honda moped ADV मध्ये 124.9cc, एअर-कुल्ड, SOHC इंजिन दिले आहे. जे 8.8 bhp पॉवर आणि 11 Nm इतका टॉर्क जेनरेट करतो.
  • २)गियरबॉक्स- यात 4-स्पीड सेमी-ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिला आहे.
  • 3) ड्युल डिस्क ब्रेक आणि ABS चा समावेश आहे.
  • ४) पेट्रोल टाकी – या मोपेडमध्ये 5.3 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे.
  • ५)वजन- 120 किलोग्राम.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24