Honey in Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन करणे योग्य? जाणून घ्या तज्ञांचे मत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honey in Diabetes : आजच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयीतील बदलांचा परिणाम शरीरावर दिसून येत आहे. खराब खाण्यापिण्याच्या सवयींनमुळे बहुतेक लोकांना मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बऱ्याच वेळा शारीरिक हालचालींअभावी देखील लोकांना मधुमेह होत आहे.

डॉक्टरांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून हा आजार टाळता येऊ शकतो. याव्यतिरिक्त, त्याचे दुष्परिणाम देखील कमी केले जाऊ शकतात. अशातच बऱ्याच वेळा प्रश्न पडतो मधुमेह असलेले लोक मधाचे सेवन करू शकतात का? कारण रक्तातील साखरेची पातळी आणि इतर परिस्थिती नियंत्रणात असणे फार महत्वाचे आहे.

मधुमेह कधी होतो?

मधुमेह हा चयापचयाशी संबंधित आजार आहे. यामध्ये इन्सुलिनचे उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. अशा स्थितीत तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. शारीरिक हालचालींअभावी लोक मधुमेहाला बळी पडतात. त्याचबरोबर जंक फूड खाणाऱ्या लोकांनाही मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

मधुमेहामध्ये मध खाणे योग्य की अयोग्य?

आजही या विषयावर दोन प्रकारची मते आहेत. एक गट मधुमेहामध्ये मध न खाण्याचा सल्ला देतो, तर दुसरा गट तो खाण्यास काहीच हरकत नसल्याचा दावा करतो. सध्या यावर संशोधन चालू आहे. तज्ञांच्या मते मध साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे, त्यामुळे मधाचा वापर अगदी मर्यादित प्रमाणात करता येतो. मधामध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज आढळतात. यासोबतच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, एन्झाइम्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात. अशा परिस्थितीत साखरेऐवजी मध वापरणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मधाचे इतर फायदे :-

मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म असतात. काही प्रकारचे मध त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत. साखरेला पर्याय म्हणून मध वापरता येतो.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यक्तीला जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह झाल्यानंतर रोज व्यायाम केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. तसेच, यामुळे मूत्रपिंडावरील अतिरिक्त दबाव कमी होऊ शकतो. या काळात योगासने करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. मांडुक आसन सारखी काही योगासने स्वादुपिंड सक्रिय करण्यास मदत करतात, जे कधीकधी पुन्हा इन्सुलिन तयार करण्यास सुरवात करतात.