झोप हा एक दैनंदिन आयुष्यातील महत्वपूर्ण काम. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी व शरीर पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी झोप आवश्यक असते. ज्याला पुरेशी झोप मिळते तो अनेक आजारांपासून दूर राहतो असे तज्ज्ञ म्हणतात. परंतु बऱ्याचवेळा किती झोपले पाहिजे असा प्रश्न अनेकांना पडतो.
किती तास झोप शरीरासाठी आवश्यक आहे हे आपणा सर्वाना माहित असणे आवश्यक आहे. तर झोपेचे तास , झोपेची वेळ ही वयानुसार बदलत असते. शरीराला वेगवेगळ्या वयात कमी- अधिक प्रमाणात झोपेची गरज असते. चला आपण त्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊयात
कोणाला किती तास झोप हवी ?
० ते ३ महिने बालकास १४ ते १७ तास झोप हवी
४ ते १२ महिने वयाच्या बालकास १२ ते १६ तास झोप हवी
१ ते २ वर्षे वयाच्या मुलास ११ ते १४ तास झोप हवी
३ ते ५ वर्षे वयाच्या मुलास १० ते १३ तास झोप हवी
६ ते १२ वर्षे वयाच्या मुलास ९ ते ११ तास झोप हवी
१३ ते १८ वर्षे तरुणास ८ ते १० तास तर वर्षांपासून पुढील सर्वाना ७ तास झोप हवी
काही गोष्टींचा आरोग्यावर होतोय परिणाम
सध्या लहान मुलांपासून थोरांपर्यंत मोबाइल वापराचे प्रमाण वाढलेले दिसते. मोबाइलच्या अतिवापरामुळे झोप पूर्ण होत नसते. अनेकदा झोप येत असतानाही मुले डोळ्यांना ताण देऊन मोबाइल पाहत असतात. रात्री उशिरापर्यंत मोबाइल हाताळत बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुले लवकर उठत नाहीत. त्यामुळे चहा, नाश्ता, जेवण या सर्व वेळा बदलतात. या सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो आहे. त्यामुळे चांगला आहार आणि त्यासोबत योग्य, पुरेशी झोपही शरीराला आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
इतर महत्वाची माहिती
आजारी असल्याकारणाने किवा थकवा येत असेल तर लहान मुले थोडी जास्त झोपू शकतात. लहान बाळ पूर्ण दिवसात २० ते २२ तास झोप घेत असेल आणि स्तनपानाकरितासुद्धा उठत नसेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात.