लाईफस्टाईल

कास्ट सर्टिफिकेटसाठी आपल्या मोबाईल वरून अर्ज कसा करायचा ? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Caste Certificate Online Application : जात प्रमाणपत्र अर्थातच कास्ट सर्टिफिकेट हे शिक्षण, राजकारण, शाळा-कॉलेजमधील ऍडमिशन, सरकारी नोकरी अशा वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक असलेले एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे कागदपत्र नसले तर अनेकदा सरकारी काम होत नाही.

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी देखील हे डॉक्युमेंट खूपच महत्त्वाचे ठरते. मात्र हे कागदपत्र काढताना अनेकांना अडचण येते. जात प्रमाणपत्र कसे आणि कुठे मिळते हेच अनेकांना माहीत नसते. यामुळे तहसील किंवा सेतू कार्यालयात असणारे एजंट लोक सर्वसामान्यांची मोठी फसवणूक करतात आणि त्यांच्याकडून मनमानी वसुली करतात. अशा परिस्थितीत आज आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी घरबसल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो, यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याविषयी सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कास्ट सर्टिफिकेटसाठी लागणारी कागदपत्रे

Proof of Identity ओळखीचा पुरावा : पॅन कार्ड, पासपोर्ट, RSBY Card, मनरेगा जॉब कार्ड, ड्राइवर लायसन्स, अर्जदाराचे फोटो, सरकारी किंवा निम सरकारी संस्थांनी दिलेले ओळखपत्र यापैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागते.

Proof of address अर्थात रहिवासी पुरावा : पासपोर्ट, वॉटर बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, सातबारा आणि आठ अ उतारा यापैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागते.

अनिवार्य कागदपत्रे
1)इतर संबंधित कागदोपत्री पुरावे
२) जात प्रमाणपत्राच्या समर्थनार्थ पुरावा
३) अर्जदाराच्या मूळ गावाचा पुरावा
४) प्रतिज्ञापत्र जात प्रमाणपत्र (फॉर्म-२) आणि (प्रपत्र-३)
५) महसूल नोंदी किंवा ग्रामपंचायत रेकॉर्डची प्रत
६) प्रतिज्ञापत्र जातीचे प्रमाणपत्र ST जात (फॉर्म-A-1)
7) अर्जदार/वडील/किंवा नातेवाईकांच्या जन्म नोंदीचा उतारा
8) अर्जदार किंवा त्याच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला
9) वडिलांचे किंवा नातेवाईकांपैकी कोणतेही असल्यास वैधता प्रमाणपत्र जे छाननी समितीने जारी केले आहे
10) अर्जदार, त्याचे वडील किंवा आजोबा यांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा
11) सरकारी सेवा अभिलेखाचा उतारा (पुस्तक) अर्जदारांच्या वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या जात/समुदाय प्रवर्गाचा उल्लेख करणारी कागदपत्रे
12) जात आणि सामान्य निवासस्थानाच्या आधीचे कागदपत्र जातीच्या अधिसूचनेची तारीख
तथापि कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करणार ? :- जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागेल. येथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर लॉगिन करायचे आहे. वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला महसूल विभागातून जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. यानंतर तुम्हाला तिथे लागू करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर जो फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. यानंतर तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत अपलोड करावे लागणार आहे. कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. तसेच तुम्हाला यासाठी शुल्क देखील भरावे लागणार आहे. शुल्क भरून झाल्यानंतर आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर अर्जाची आणि शुल्क भरण्याची पावती तुम्हाला जपून ठेवावी लागणार आहे. जर तुम्ही सादर केलेली कागदपत्रे यथायोग्य असतील तर तुमचे जातीचे प्रमाणपत्र 21 दिवसात मिळते.

Ahmednagarlive24 Office