Age Nationality and Domicile Online Application : जर तुम्हालाही ऑनलाइन एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल अर्थातच वय अधिवास प्रमाणपत्र काढायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरे तर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
शेतकरी, महिला, शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक इत्यादींसाठी शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र वय आधिवास प्रमाणपत्र लागते. याशिवाय म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास देखील वय अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थ्यांना देखील हे कागदपत्र लागते. ऍडमिशन साठी तसेच शिष्यवृत्तीसाठी या कागदपत्राची गरज भासते. याव्यतिरिक्त इतरही अन्य महत्त्वाच्या शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये हे कागदपत्रे खूपच गरजेचे असते.
मात्र हे कागदपत्रे काढायचे कसे हाच सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. अशा परिस्थितीत आज आपण वय अधिवास प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाईन कसे काढले जाऊ शकते याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वय अधिवास प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी
ओळखीचा पुरावा : यासाठी खाली दिलेल्या दहा कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागते.
१) पॅन कार्ड २) पासपोर्ट ३) आरएसबीवाय कार्ड ४) आधार कार्ड ५) मतदार ओळखपत्र ६) मनरेगा जॉब कार्ड ७) ड्रायव्हिंग लायसन्स ८) अर्जदाराचा फोटो ९) अर्जदाराची स्वाक्षरी १०) शासकीय किंवा निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा : यासाठी खाली दिलेल्या दहा कागदपत्रांपैकी किमान एकक कागदपत्रे सादर करावे लागते. 1) पासपोर्ट2) पाणी बिल 3) रेशन कार्ड 4) आधार कार्ड 5) मतदार ओळखपत्र 6) टेलिफोन बिल 7) ड्रायव्हिंग लायसन्स 8) वीज बिल 9) मालमत्ता कर पावती 10) 7/12 आणि 8 अ चे उतारे /
भाडे पावती इतर कागदपत्रे : खाली दिलेल्या अकरा कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. 1) पाणी बिल 2) रेशन कार्ड 3) भाडे पावती 4) मतदार यादी फी 5) टेलिफोन बिल 6) वीज बिल 7) विवाह प्रमाणपत्र 8) मालमत्ता कर पावती 9) मालमत्ता नोंदणी शुल्क 10) पतीचा रहिवासी पुरावा 11) 7/12 आणि 8 अ/
आरटीचे उतारे वयाचा पुरावा : यासाठी खाली दिलेल्या पाच कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्रे सादर करावे लागते. 1) SFC प्रमाणपत्र 2) बोनाफाईड प्रमाणपत्र 3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4) वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र 5) प्राथमिक शाळेतील प्रवेशाचा उतारा
रहिवासी पुरावा : यासाठी खाली दिलेल्या तीन कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते. 1) तलाठ्याचा रहिवासी पुरावा 2) ग्रामसेवकाचा रहिवासी पुरावा 3) बिल कलेक्टरकडून रहिवासी पुरावा स्वयघोषणापत्र : याशिवाय एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल या सर्टिफिकेट साठी स्वयंघोषणापत्र देखील आवश्यक असते.
वय अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा
यासाठी आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. ही शासनाची अधिकृत वेबसाईट असून या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉगिन घ्यावे लागणार आहे.
लॉगिन घेतल्यानंतर तुम्हाला महसूल विभागात जावे लागेल. महसूल विभागात तुम्हाला पहिल्या क्रमांकावर असलेल्या वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची एक यादी पाहायला मिळेल.
ही यादी काळजीपूर्वक वाचल्यानंतर खाली लागू करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. फॉर्म भरल्यानंतर आणि आवश्यक असलेले शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या काळात हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळू शकते.