Personality Test : प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, ती ज्या पद्धतीने बोलते, कसे कपडे घालते, व्यक्तीचे हावभाव यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. खरं तर, व्यक्तीचे व्यक्तिमत्व केवळ त्याच्या पोशाखावरून आणि बोलण्यावरूनच नाही तर इतर अनेक गोष्टींवरून ओळखले जाते.
एखादी व्यक्ती ज्या प्रकारे बसते, उभे राहते, जेवते, हे सर्व पाहून देखील व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. आज आपण तुम्ही ज्या पद्धतीने हात जोडता त्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्व कसे असते हे जाणून घेणार आहोत. जेव्हा एखादी व्यक्ती हात जोडते तेव्हा कोणता अंगठा वर आहे हे पाहून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. चला याविषयी जाणून घेऊया…
उजवा अंगठा
जे लोक हात जोडताना उजव्या अंगठ्याला वर ठेवतात ते स्वभावाने व्यावहारिक असतात आणि तर्कशुद्ध पद्धतीने वागतात. असे लोक मानाने कमी डोक्याने जास्त चालतात, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि त्यावर आधारित कोणताही निर्णय घेण्याची या लोकांना सवय असते. असे लोक क्वचितच रागावतात आणि शांतपणे निर्णय घेतात.
डावा अंगठा
जे लोक हात जोडताना डाव्या हाताचा अंगठा वर ठेवतात. हे लोक स्वतःबद्दल खूप जागरूक असतात. स्वतःसोबतच ते इतरांच्याही भावना समजून घेतात आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचे काम करतात. त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की लोकं त्यांच्या सोबत राहणे पसंत करतात.
दोन्ही अंगठे सोबत ठेवणे
जे लोक हात जोडताना दोन्ही अंगठे समान ठेवतात. हे लोक संतुलित प्रकारचे असतात. त्यांचे लक्ष छोट्या छोट्या गोष्टींकडे जाते आणि त्यांच्याकडे नेहमी माहितीचा खजिना असतो. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते, त्यामुळे लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. लोक त्यांच्याकडे मदतीसाठी येतात कारण त्यांना परिस्थिती शांतपणे कशी हाताळायची हे माहित असते.