लाईफस्टाईल

‘या’ शेअर्स मध्ये 1 लाख गुंतवले असते तर झाला असता कोट्याधीश

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- शेअर मार्केट मध्ये सुरु असलेली पडझड बघता गुंतवणूक करावी कि नाही याबाबत मनात संभ्रम निर्माण होतो.मात्र आज आम्ही तुम्हाला एका आशा शेअर्स बाबत सांगणार आहोत ज्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कोट्याधीश केले.

दीपक नायट्रेटच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. दीपक नायट्रेटच्या शेअर्सनं गेल्या 10 वर्षांत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 13,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

दीपक नायट्रेटचे मार्केट कॅप 27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या शेअर्सची कामगिरी इतकी उत्तम राहिली आहे की, 1 लाख रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार काही वर्षांत कोट्यधीश झाले आहेत.

23 मार्च 2012 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दीपक नाइट्राइटचे शेअर्स 14.70 रुपयांच्या पातळीवर होते. 15 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 2,142.50 रुपयांच्या पातळीवर होते.

कंपनीच्या समभागांनी 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 13,780 टक्के रिटर्न्स दिले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 23 मार्च 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या त्याची किंमत 1.37 कोटी रुपये झाले असते.

म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या व्यक्तीला थेट 1.36 कोटी रुपयांचा फायदा झाला असता. तसेच 17 फेब्रुवारी 2017 रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर दीपक नायट्रेटचे शेअर्स 103.65 रुपयांच्या पातळीवर होते. 15 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2,142.50 रुपयांच्या पातळीवर आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office