लंडन : दारूची तल्लफ कमी करण्याचे नवीन पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. एका ताज्या अध्ययनाआधारे त्यांनी असा दावा केला आहे की, दररोज व जास्त प्रमाणत मद्यसेवन करणाऱ्या लोकांना केटामाइन औषधाचा एक डोस देऊन त्यांची मद्याची तल्लफ उल्लेखनीय रुपात कमी केली जाऊ शकते.
नेचर कम्युनिकेशन नियतकालिकामद्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनानुसार, केटामाइनच्या एका डोसामुळे अति जास्त प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या लोकांची तल्लफ कमी झाली झाल्याचे दिसून आले.
९० लोकांवर सुमारे नऊ महिने करण्यात आलेल्या एक प्रयोगात्मक अध्ययनाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ रवी दास यांनी सांगितले की, जास्त प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या लोकांवर आम्हाला एका सहजसोप्या प्रयोगात्मक उपचाराचा दीर्घकालीन प्रभाव आढळून आला.
याच युनिव्हर्सिटीतील संजीव कांबोज यांनी सांगितले की, केटामाइन एक सुरक्षित आणि सामान्य औषध असून त्याचा प्रभाव नैराश्यासह विविध मनोरोगांवर पारख केली जात आहे. या औषधाची मद्याच्या व्यसनापासून सुटका करून घेण्याची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे.