अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- आपल्या दैनंदिन आहारात आपण नेहमीच कांदा वापरतो. परंतु आज आम्ही तुम्हाला कांद्याचे काही असे चमत्कारी फायदे सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचे हृदयाचे आरोग्य समृद्ध होईल. शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं आहेत.
अनिमित जीवनशैली, आहारात झालेला बदल यांमुळे अनेकदा कॉलेस्ट्रॉल वाढतं. कांदा हा शरीरासाठी लाभदायक ठरतो. शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून कांद्याचा वापर कसा करायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1) रोगप्रतिकारकशक्ती वाढवते एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कांद्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.
फ्लेवोनोईड्स आणि अनेर एंटी इंफ्लेमेंट्री गुण असल्यामुळे कांदयाच्या सेवनाने आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. कांद्यात फायटोकेमिकल असते. त्यामुळे शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते.
2 ) आहारात कांद्याचा समावेश केल्यास पचनक्रिया व्यवस्थित राहते.
3 ) कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते जे आपल्या रक्तास शुध्द करण्याचे कार्य करते. कांद्यात अनेक एंटी बॅक्टेरिअल गुण असतात जे व्हायरसशी लढण्यासाठी फायदेशीर ठरतात.
4) कांद्याच्या गरम रसाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी यामुळे पायांना आराम मिळतो.
5) ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार कांद्यात फ्लेवोनॉईड्स कमी घनत्व असणारे वाले लिपोप्रोटीन (एलडीएल), लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांमधील कॉलेस्ट्रॉल कमी करू शकतात.
फूड एंड फंक्शन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार हृदयाच्या आजारांना स्वतःपासून लांब ठेवायचं असेल तर कांदयाचे सेवन करायला हवे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com