Plastic Bottle Side Effects : उन्हाळ्याच्या हंगामात लोकं बाहेर पडली की, पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. होय, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
प्लास्टिक हे पर्यावरणासोबतच तुमच्या आरोग्यासाठीही अत्यंत हानिकारक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, पाण्याच्या बाटलीमध्ये चतुर्थांश दशलक्ष प्लास्टिकचे कण असतात जे धोकादायक असतात. यापैकी 10 टक्के मायक्रोप्लास्टिक आणि 90 टक्के नॅनोप्लास्टिक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आढळणारे मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीराच्या अनेक प्रणालींवर परिणाम करतात जसे की पचन, श्वसन आणि रोगप्रतिकार प्रणाली कमकुवत होते.
प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिल्याने काय आरोग्य समस्या होतात?
प्रतिकारशक्ती कमकुवत करणे
प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित होते, ज्यामुळे ते कमकुवत होऊ शकते. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक्स तुमच्या रक्ताभिसरणात प्रवेश करत असल्याने ते शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतात.
स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका
जेव्हा प्लास्टिकची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती डायऑक्सिन नावाचे रसायन सोडते. या रसायनामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.
हार्मोनल असंतुलन
बीपीए म्हणजेच प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये आढळणारे बी फिनाइल ए तुमच्या शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकते. बाटलीबंद पाणी पिण्यामध्ये बीपीए असते, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे लवकर यौवन आणि मधुमेह होऊ शकतो.