Eat Cucumber With Salt : उन्हाळा असो किंवा हिवाळा आपण जेवणासोबत काकडीचे सेवन करतो, तसेच आपण सॅलडच्या स्वरूपात देखील सेवन करतो. काकडीत असलेले पाण्याचे प्रमाण शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लोक अनेकदा काकडी कच्ची खातात. यामध्ये 96 टक्के पाणी आणि इतर अनेक जीवनसत्त्वे आढळतात.
योग्य पद्धतीने काकडीचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने सेवन केल्याने शरीराला गंभीर नुकसान देखील होऊ शकते. काही लोक याचे सेवन मीठासोबतही करतात. पण काकडी मिठासह खाणे खरोखर फायदेशीर आहे? हे आज आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
काकडीमध्ये भरपूर पाणी असते, कॅलरीज कमी असतात आणि भरपूर जीवनसत्त्वे असतात. पाण्याव्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, मँगनीजसह अनेक पोषक तत्वे काकडीत आढळतात. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास आणि शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते.
काकडी मीठ घालून खाल्ल्याने अधिक चविष्ट लागते, मीठ शरीरासाठी आवश्यक असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला हानी पोहोचते. म्हणूनच मिठाचे सेवन संतुलित प्रमाणात केले पाहिजे. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब वाढू शकतो.
काकडीसोबत मोठ्या प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचा दैनंदिन मिठाचे प्रमाण वाढू शकते. ते नियंत्रित करण्यासाठी, आपल्याला प्रमाण लक्षात ठेवले पाहिजे. काकडीसोबत मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात उच्च रक्तदाब आणि पाणी टिकून राहण्याचा धोका वाढतो. याशिवाय जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला इतर अनेक समस्यांचा धोका असतो. त्यामुळे समस्या टाळण्यासाठी काकडींसोबत जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळावे.
काकडीसोबत मीठ फार कमी प्रमाणात खावे. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वर नमूद केलेल्या समस्यांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, निर्जलीकरण आणि इतर समस्या असल्यास मीठ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे.
मीठाव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात काकडीचे सेवन केल्याने शरीराला हानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवसभरात जास्त काकडी खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. मीठामध्ये असलेल्या सोडियमचे संतुलित प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्याचे अतिसेवन आरोग्यासाठीही घातक आहे.