लाईफस्टाईल

ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं तर घाबरू नका व कुणाला पैसेही देऊ नका, डुप्लिकेट लायसन्स काढण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

Published by
Ahmednagarlive24 Office

ड्रायव्हिंग लायसन्स हे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट. हे लायसन्स असेल तरच तुम्ही वाहने रस्त्यावर चालवू शकता. अन्यथा तुम्हा दंड पडेल. याचा अनुभव अनेकांनी घेतलाही असेल. परंतु बऱ्याचदा आपल्याकडून हे महत्वाचे डॉक्युमेंट्स हरवून जाते.

त्यामुळे अनेक लोक गडबडून जातात. परंतु जर तुमच्याबाबतीतही असे घडले असेल तर मग मात्र गडबडून जाऊ नका. ही बातमी वाचा.

येथे आम्ही तुम्हाला लायसन्स हरवले तर ते पुन्हा डुप्लिकेट लायसन्स कसे काढावे याची ऑनलाईन व ऑफलाईन असे दोनीही पर्यायांची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स हे मूळ लायसन्सइतकेच वैध असते.

प्रथम आपण ऑफलाइन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती पाहू

– ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्य परिवहन विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. येथे तुम्हाला डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज मिळेल.

– हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल. यासोबतच तुम्हाला या फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. यानंतर तुम्हाला हा फॉर्म त्याच कार्यालयात जमा करावा लागेल. फी भरावी लागेल. फी भरल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. तुम्ही या पावतीद्वारे अर्जाची स्थिती तपासू शकता.

आता जाणून घेऊयात ऑनलाईन पद्धतीने लायसन्स कसे काढावे :-
– सर्वात आधी लायसन्स हरवल्याची पोलिसांत एफआयआर द्या. याचे कारण असे की डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना या एफआयआरची प्रत जोडणे गरजेचे आहे.

– राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला Apply for Duplicate Driving License चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती टाकावी लागेल. तुम्हाला FIR कॉपी देखील अपलोड करावी लागेल. तुम्ही ऑनलाईन फी भरू शकता.

– फी भरली की तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल. आता तुमचे काम झाले. यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेट्स हा अर्ज क्रमांक वापरून पाहू शकता.

डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स जारी होण्यासाठी आठवडा लागतो :- डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स 7 ते 10 कामकाजाच्या दिवसांत जारी केले जाते. अशा प्रकारे, तुम्ही जरी तुमचे लायसन्स हरवले तरी अशा पद्धतीने अर्ज करून डुप्लिकेट लायसन्स मिळवू शकता.

Ahmednagarlive24 Office