अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- लॉकडाउन काळात अनेक लोक प्रत्येक्ष न भेटता, मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यात व्हॉट्सअॅप तर यात अत्यंत महत्त्वाचं आहे.
व्हॉट्सअॅप सध्या आपल्या नवीन प्रायव्हसी धोरणामुळे वादात सापडले आहे. व्हॉट्सअॅपने त्याच्या यूझर्सना नवीन धोरण स्वीकारण्यासाठी रिमांडर देण्यास सुरवात केली आहे. आयटी मंत्रालयाने यापूर्वी व्हॉट्सअॅपला ही पॉलिसी रद्द करण्यास सांगितले होते.
त्यांनी हे देखिल सांगितले होते की, व्हॉट्सअॅपने आठवड्याभरात सरकारला योग्य ते उत्तर न दिल्यास त्यांच्या विरूद्ध कारवाई केली जाईल. परंतु आता व्हॉट्सअॅपकडून परत रिमांईंडर येत असल्यामुळे व्हॉट्सअॅपने आपली ही पॉलिसी मागे घेतल्याचे दिसत नाही.
दरम्यान इंस्टेंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार न करणाऱ्या युजर्सबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. व्हाट्सअँपने म्हटले की, कोणत्याही युजर्ससाठी काही आठवड्यात फीचर्सला बंद केले जाणार नाही.
परंतु, नवीन पॉलिसी स्वीकार केली नसेल तर युजर्संना अपडेट संबंधी वारंवार अलर्ट दिला जाईल. व्हाट्सअँपने सांगितले की, भारतात वैयक्तिक डेटा सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत कंपनी थांबणार आहे.
याआधी आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, युजर्स व्हाट्सअँपची नवीन पॉलिसी १५ मे पर्यंत स्वीकार न केल्यास त्या युजर्संची फीचर्स मर्यादीत करण्यात येणार आहे. रिपोर्टमध्ये हाही दावा करण्यात आला होता की, युजर्स केवळ व्हाट्सअँप कॉल्सचे उत्तर देऊ शकतील.
परंतु, मेसेज करू शकणार नाहीत. परंतु, कंपनीने नवीन स्पष्टीकरण दिले असून यातून स्पष्ट होते की, असे काहीही होणार नाही.