नखांवरील नेलपेंट टिकवायची आहे तर फॉलो करा ह्या टिप्स.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- प्रत्येक मुलीला लांब आणि सुंदर नखे प्रिय असतात जेणेकरून त्यांचे हात अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतील. आणि याच हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखांवर नेल पेंट करणे सर्वच मुली पसंत करतात.

बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नेलपेंट करण्याचे प्रकार उपलब्ध आहेत मात्र अनेक वेळा नखांवरील नेलपेंट लवकर खराब झाल्याची तक्रार केली जाते.

नखांवर योग्य प्रमाणात किंवा चुकीच्या प्रकारे नेलपेंट लावले गेल्यास या गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. या सर्व प्रकारापासून सुटका मिळविण्यासाठी योग्यप्रकारे नेल पेंट लावण्याची पद्धत आजमावणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया योग्य प्रकारे नेल पेंट लावण्याच्या पद्धती.

नखांचा चा आकार :- नखांवर पेंट करण्या आधी नखांचा आकार म्हणजेच शेप योग्य असावा याची काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा नखे सुंदर दिसण्या ऐवजी कुरूप दिसू लागतील. सोबतच नखे पूर्णपणे कोरडी असतील याची काळजी घ्यावी.

चांगल्या क्वालिटीचे बेस कोट :- जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा नेलपेंट जास्तीत जास्त काळासाठी टिकावा तर त्यासाठी चांगल्या क्वालिटीचे बेस कोट वापरणे गरजेचे आहे. म्हणून हलक्या किंवा खराब क्वालिटीचे नेलपेंट विकत घेण्याऐवजी चांगल्या क्वालिटीचे बेस कोट विकत घेणे कधीही फायदेशीर ठरते

नेलपेंट लावण्याचा योग्य प्रकार :- जेव्हा ट्रान्सपरंट बेस कोट चांगल्या प्रकारे सुकले असेल त्यावेळी तुमच्या आवडत्या रंगाचे नेलपेंट नखावर लावावे. नेल पेंट लावताना नेहमी नखांच्या मध्ये लावावे नंतर साईडच्या कोपऱ्यांना नेल पेंट लावावे. असे केल्याने नेलपेंट पूर्ण नखावर सारख्या प्रमाणात पसरते.

नेलपेंट योग्यप्रकारे सुकू द्या:- नेलपेंट लावल्यानंतर ते सुकण्याची वाट पहा अन्यथा त्याच्यावर डाग पडण्याची भीती असते किंवा इतर काही काम करताना ओरखडे ओढण्याची शक्यता असते. यामुळे नेलपेंट लावल्यानंतर ते पूर्णपणे सुकेपर्यंत वाट पाहणे सोयीस्कर ठरते.

नेहमी चांगल्या क्वालिटीची नेलपेंट निवडावी :-जर तुम्हाला तुमची नखे सुंदर दिसावी असे वाटत असेल तर नेहमी चांगल्या क्वालिटीची नेलपेंट विकत घ्यावी. त्यासाठी तुम्ही त्या क्षेत्रात असणाऱ्या एक्सपर्ट चा सल्ला देखील घेऊ शकता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24