अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लवकरच 2019 वर्ष संपणार आहे आणि 2020 वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काही खास उपाय करून आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकता
राशीनुसार तुम्ही जर हे उपाय योजले तर 2020मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर धन प्राप्ती होऊ शकते तर धनप्राप्तीसाठी काय उपाय केले पाहिजे ते राशीनुसार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
मेष: यावर्षी नियमित रूपामध्ये सूर्याला जल अर्पण करा. लाल चंदनाचा टिळा माथ्यावर किंवा गळ्यावर लावा याने तुमच्या आयुष्यामध्ये धनलाभ होईल.
वृषभ: या वर्षी नियमित रूपांमध्ये शंकराला जल अर्पित केल्याने आणि चांदीचे एक नाणे आपल्या जवळ ठेवल्याने धनलाभ होईल.
मिथुन: यावर्षी हनुमानाची उपासना करावी आणि प्रत्येक मंगळवारी हनुमानाला लाल फुल चढवावे.
कर्क: यावर्षी आई लक्ष्मीची उपासना करा आणि रोज श्रीसूक्तम् पाठ करा.
सिंह: यावर्षी श्रीगणेशाची उपासना करावी, नित्य पहाटे सूर्याला जल अर्पण करावे.
कन्या: यावर्षी आई दुर्गेची उपासना करावी आणि नियमित रूपाने त्यांना लवंग अर्पण करावी.
तूळ: यावर्षी शनि देवाची उपासना करणे लाभदायक ठरेल, प्रत्येक शनिवारी शनीला तेल अर्पण करावे.
वृश्चिक: यावर्षी भगवान विष्णूची उपासना करावी आणि एक सोन्याचा किंवा पितळाचा रुपया धारण करावा.
धनु: यावर्षी सूर्य देवाची उपासना करावी एक तांब्याचे नाणे आपल्याजवळ जरूर ठेवावे.
मकर: यावर्षी या राशीच्या लोकांनी शनी देवाची उपासना करावी प्रत्येक शनिवारी शनीला तेल दान करावे
कुंभ : यावर्षी भगवान शंकराची उपासना करणे चांगले राहील शक्य असेल तर प्रत्येक सोमवारी उपवास धरावा
मीन : यावर्षी गायत्री मंत्राचा नियमित जप करावा सोबतच द्राक्षाच्या माळा सुद्धा धारण कराव्यात