July Surya Gochar : ग्रहांचा राजा सूर्य हा यश, पिता, ऊर्जा, कीर्ती, आदर, उच्च स्थान इत्यादींचा कारक मानला जातो. अशातच सूर्याच्या हालचालीला विशेष महत्व आहे. सूर्य दर महिन्यात आपली चाल बदलत असतो. अशातच 6 जुलै रोजी सूर्य देव चंद्रच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.
चंद्र आणि सूर्य हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. अशातच सूर्याच्या राशीतील हा बदल सर्व राशींवर परिणाम करेल. काहींना फायदा होईल तर काहींना नुकसान होईल. आपण अशा काही राशी आहेत ज्यांना सर्वाधिक फायदा होईल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण वरदानापेक्षा कमी नसेल. या काळात धैर्य आणि शौर्य वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील -समाजात मान-सन्मान वाढेल. पदोन्नतीची शक्यता आहे. भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील. धार्मिक व अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.
कर्क राशीचे चिन्ह
कर्क
राशीच्या लोकांनाही या काळात फायदा होणार आहे. तब्येत सुधारेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायातही फायदा होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनाही सूर्यदेवाची विशेष कृपा असेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापारी आणि नोकरदारांसाठी काळ शुभ आहे. नवविवाहित जोडप्याला अपत्यप्राप्ती होऊ शकते. आर्थिक स्थितीही मजबूत राहील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना या काळात प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार होईल. कार्यक्षेत्रातही तुमची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतील.