Healthy Vegetables : निरोगी आयुष्यासाठी आहार खूप महत्वाचा आहे. नियोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही सुधारणा करणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी महागड्या गोष्टी खाण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या आहारात भाज्यांचा समावेश करूनही निरोगी राहू शकता. आजच्या या लेखात आम्ही अशाच भाज्या घेऊन आलो आहोत ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात सहज समावेश करू शकता. चला तर मग जाणून घेऊया-
लसूण
लसूणमध्ये मॅंगनीज, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. हे एक सुपरफूड आहे जे अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये वापरले जात आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत तर करतेच पण हृदयाच्या आरोग्यासही प्रोत्साहन देते आणि रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही मदत करते. याशिवाय यामध्ये कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन बी1 देखील चांगल्या प्रमाणात असते. असे असले तरी लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
वाटाणा
हिरवे वाटाणे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. फक्त एक वाटी वाटाणे तुम्हाला 9 ग्रॅम प्रथिने आणि जीवनसत्त्वे ए, सी आणि के, रिबोफ्लेविन, थायामिन, नियासिन आणि फोलेट यांसारखे इतर पोषक घटक प्रदान करतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेचा धोकाही कमी असतो.
पालक
पालक हे लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले सुपरफूड आहे. केवळ 30 ग्रॅम कच्च्या पालकातून 56 टक्के व्हिटॅमिन ए मिळते. पालक रोज खाल्ल्याने कर्करोग, टाईप २ मधुमेह, दमा, रक्तदाब कमी होणे आणि पचनक्रियेचा धोका कमी होण्यास मदत होते.
ब्रोकोली
या भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ही भाजी कच्ची आणि शिजवून दोन्ही पद्धतीने खाल्ली जाऊ शकते, परंतु जास्तीत जास्त आरोग्य फायदे मिळविण्यासाठी ती थोडीशी उकडावी आणि मगच त्याचे सेवन करावे.
गाजर
गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन हे अँटीऑक्सिडंट असते जे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. याशिवाय, ते रक्तदाब देखील कमी करू शकते, ते डोळ्यांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे, आणि वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते.