100 वर्ष जुना इतिहास असलेल्या खासगी बॅंकेचा येतोय आयपीओ!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- देशातील सर्वात जुन्या खाजगी बँक तामिळनाड मर्केंटाईलचा आयपीओ लवकरच बाजारात येऊ शकतो. याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रं त्यांनी सेबीकडे सादर केली आहेत.

यातून बँकेच्या भांडवली गरजा पूर्ण करण्याचा विचार आहे.तमिळनाड मर्केंटाईल बँक या आयपीओमधून भांडवली गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

तमिळनाड मर्केंटाईल बँक ही देशातील सर्वात जुन्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. या बँकेला जवळजवळ 100 वर्ष जुना इतिहास आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना या आयपीओमधून जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तमिळनाड मर्केंटाईल बँकेच्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या शाखा आहेत. अंदाजे 60 लाख ग्राहक या बँकेला लाभले आहेत.

तर दुसरीकडे शेअर बाजार तेजीत असल्यामुळे याचा फायदा गुंतवणूकदारांना येत्या काळात होऊ शकतो, अशी शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office