IRCTC : प्रवाशांसाठी रेल्वेची खास सेवा! एकही रुपया न देता घरबसल्या बुक करता येणार तिकीट, कसं ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IRCTC : इतर वाहनांपेक्षा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन योजना आणत असते. ज्याचा फायदा देशभरातील लाखो प्रवाशांना होतो. परंतु रेल्वेच्या अशाही काही सुविधा आहेत ज्याची अनेकांना कसलीच कल्पना नाही.

यापैकी एक म्हणजे तुम्ही आता घरबसल्या तिकीट बुक करू शकता. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत त्यामुळे अनेकजण तिकीट बुक करत आहेत. परंतु तुम्ही आता एकही रुपया न देता घरबसल्या तिकीट बुक करू शकता. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या खास सुविधा

प्रवाशांना आता आयआरसीटीसी पेटीएमद्वारे पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करण्याचा पर्याय देत आहे. या सेवेचे Buy Now, Pay Later नाव आहे. तुम्हाला पेटीएमद्वारे तिकिटासाठी पैसे देऊन, तिकीट बुक करू शकता. जर तुम्ही तिकीट बुक करण्यासाठी पेटीएम पोस्टपेड वापरत असाल तर, तुम्हाला 30 दिवसांनंतर पैसे परत करावे लागणार आहे. या सुविधेद्वारे तुम्ही त्वरित पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकता.

असे करा तिकीट बुक

1. सर्वात अगोदर तुमच्या स्मार्टफोनवर IRCTC अॅप डाउनलोड करून त्यात लॉग इन करा.
2. आता तुमचा प्रवास तपशील प्रविष्ट करून यात स्थानकाच्या माहितीसह तारीखही टाका.
3. त्यानंतर ट्रेन निवडून तिकीट बुक करण्यासाठी पुढे जा.
4. आता तुम्ही पेमेंट विंडोवर पोहोचल्यास तुम्हाला आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या हा पर्याय निवडावा लागणार आहे.
5. पेटीएम पोस्टपेड वर क्लिक करून तुमचे पेटीएम लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
6. तुम्ही क्रेडेन्शियल्स एंटर केले तर, तुम्हाला एक सत्यापन एसएमएस प्राप्त होऊ शकतो.
7. आता बुकिंग निश्चित करण्यासाठी OTP प्रविष्ट करा.