High Cholesterol : कोलेस्टेरॉल रुग्णांसाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर आहे का? वाचा…

Content Team
Published:
High Cholesterol

High Cholesterol : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींनमुळे शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी औषधांव्यतिरिक्त योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये तुम्ही ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता. औषधांव्यतिरिक्त, शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी ब्लॅक कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

आजच्या काळात ब्लॅक कॉफी पिण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. विशेषत: जे लोक फिटनेसबद्दल जागरूक असतात त्यांची सकाळची सुरुवात ब्लॅक कॉफीने होते. ब्लॅक कॉफीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. खरं तर ब्लॅक कॉफी संतुलित प्रमाणात पिणे हे उच्च कोलेस्टेरॉल तसेच हृदयाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. त्यात जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने अनेक गंभीर धोके होऊ शकतात. अशास्थितीत कोणत्या गोष्टीचे सेवन हे मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.

उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये ब्लॅक कॉफी कशाप्रकारे काम करते?

ब्लॅक कॉफीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफीन कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने हायपरलिपिडेमिया आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते.

ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीन घेतल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. हे वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात मदत करू शकते.

यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी पिण्याचे तोटे

-ब्लॅक कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने झोपेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

-ब्लॅक कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तदाब वाढू शकतो. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी याचे सेवन टाळावे.

-ब्लॅक कॉफीच्या अतिसेवनामुळे अपचन, ऍसिडिटी आणि छातीत जळजळ यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

टीप : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही जीवनशैलीत काही बदल करू शकता. यासाठी नियमित व्यायाम करावा. आणि योग्य आहार घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe