अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक आणि आयर्न असते आणि म्हणूनच पनीर खाणं आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
पण काहीवेळा पनीर खाणे सुद्धा योग्य नाही. ज्या लोकांच्या शरीरामध्ये यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले आहे, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला हा दिला जातो. आणि ज्यांना प्रोटीनची जास्त आवश्यकता आहे त्यांना आवर्जून पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो. पनीर हे हेल्दी फूड कॅटेगरीमध्ये येते. मात्र ते कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जाणून घ्या याबाबत…
जाणून घ्या पनीर किती आणि कधी आणि कसं खावं – पनीर एका दिवसात २०० ग्रॅमहून अधिक खाऊ नये. एका वेळेत १०० ग्रॅम पनीर पुरेसं असतं. जर आपल्या शरीरात वॉटर रिटेंशनची समस्या असेल तर अशा व्यक्तीनं रात्री कधीही पनीर खाऊ नये.
अशा व्यक्तींनी पनीर नाश्ता किंवा लंचमध्येच खावं. तरच ते शरीरासाठी फायदेशीर ठरेल. जर आपल्याला रात्री पनीर खायचं असेल तर ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच खावं. रात्री उशीरा पनीर खाऊ नये. पनीर केव्हाही जास्त प्रमाणात फायबर असलेल्या विविध भाज्यांसोबत मिक्स्ड करून खावं.
त्यानं प्रोटीन आणि फायबरमुळे आपलं पोट खूप काळासाठी भरलेलं जाणवतं आणि ते शरीरात खूप चांगल्या पद्धतीनं पचवल्या जातं. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्या, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशिअमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतात.