Banana with Milk : दूध आणि केळीचे एकत्रितपणे सेवन चांगले आहे का?; जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banana with Milk : दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण जाणतोच, पण असे काही पदार्थ आहेत जे दुधासोबत खाण्यास मनाई आहे. अशातच बरेच जण म्हणतात, दूध आणि केळी सोबत खाऊ नये, हे दोन्ही पदार्थ विरुद्ध आहेत, पण तुम्ही हे ऐकून चकित व्हाल की, तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही दूध आणि केळी एकत्र घेऊ शकता. फक्त कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन हानिकारक असते, म्हणूनच कोणतीही गोष्ट मार्यातीच घ्यावी.

तुम्ही रात्री केळी दुधासोबत खाऊ शकता. रात्री दूध आणि केळी खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेलच, त्याचबरोबर तुमची पचनक्रियाही मजबूत होईल. पण केळी दुधासोबत रात्री उशिरा खाणे टाळावे. आजच्या या लेखात आम्ही दूध आणि केळी एकत्र खाण्याचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत

रात्री दुधासोबत केळी खाण्याचे फायदे :-

-जर तुम्ही शरीराने पातळ आणि अशक्त असाल तर तुम्ही रात्री दूध आणि केळी एकत्र खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होऊ शकते. दूध आणि केळीच्या मिश्रणाने वजन वाढण्यास मदत होते.

-दूध आणि केळी हे दोन्ही पचनासाठी चांगले मानले जातात. जर तुम्ही रोज रात्री दूध आणि केळी एकत्र सेवन केले तर ते तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत करेल. यामुळे तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम मिळू शकतो. पण ज्या लोकांना आधीच पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी रात्री केळी आणि दूध एकत्र घेणे टाळावे.

-केळीच्या सेवनाने आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, त्याचबरोबर ताकातही वाढते. केळी आणि दुधाचे रोज सेवन केल्याने काही दिवसातच माणूस तंदुरुस्त होतो आणि त्याचे शरीर मजबूत बनते.

-जर तुम्ही रात्री जिम किंवा वर्कआउट करत असाल तर केळी आणि दुधाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रात्री वर्कआउट करण्यापूर्वी तुम्ही दूध आणि केळी खाऊ शकता. हे पचन सुधारेल, तसेच वर्कआउट दरम्यान ऊर्जा राखेल.

दुधासह केळी खाण्याचे दुष्परिणाम :-

तसे, रात्री केळी न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे सर्व लोकांना लागू होत नाही. ज्यांची पचनशक्ती चांगली असते ते रात्रीच्या वेळीही दूध आणि केळी घेऊ शकतात. पण रात्री खूप उशिरा खाऊ नये.

-उशिरा रात्री केळी आणि दूध खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

-उशिरा रात्री केळी आणि दूध घेतल्याने खोकला किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो.

-केळी आणि दूध खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. म्हणूनच ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी रात्री दूध आणि केळी खाणे टाळावे.

वजन वाढवण्यासाठी दूध आणि केळी कसे खावे?

यासाठी एक ग्लास दूध घ्या. त्यात केळी, मध आणि काजू घाला. आता हे दूध प्या. यामुळे तुमचे वजन हळूहळू वाढेल.

रात्री दूध आणि केळी कसे खावे?

तुम्ही रात्री दूध आणि केळी खाण्यासाठी एक ग्लास दूध घ्या. त्यात 1-2 केळी घाला. आता ते चांगले मिक्स करा आणि प्या. जर तुम्ही रात्री व्यायाम करत असाल तर केळी आणि दुधाचे मिश्रण तुमच्यासाठी उत्तम असू शकते. व्यायामापूर्वी दुधासोबत केळी खाऊ शकता.