Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर दूध पिणे योग्य आहे का? वाचा सविस्तर…

Content Team
Published:
Health Tips

Is It Healthy To Drink Milk After Dinner : अनेकजण जेवणानंतर दूध पिण्याला प्राधान्य देतात. आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत जेवणानंतर दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कारण दुधामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे एकंदर आरोग्यासाठी आवश्यक असतात.

पण रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे ही चांगली सवयी आहे का? हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते का? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कारण सध्या बरेचजण रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे पसंत करतात.

रात्री दूध पिण्याचे परिणाम

जर तुम्ही रात्री दूध पित असाल आणि तुम्हाला पचनाच्या खूप समस्या असतील तर रात्रीच्या जेवणानंतर दूध प्यायल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. काही लोकांना वाढत्या वयाबरोबर दूध कमी पचते. अशा स्थितीत जेवल्यानंतर काही वेळातच दूध प्यायल्यास पचनास त्रास होऊ शकतो.

दुधामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. आपण रात्रीच्या जेवणातही भरपूर कॅलरी वापरतो. अशा स्थितीत रात्रीच्या जेवणानंतर दूध प्यायल्यास तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. यामुळे तुमचे वजनही वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करणारा आहार घेत असाल तर रात्रीच्या जेवणानंतर दूध टाळावे.

काही लोक झोपण्यापूर्वी दूध पितात जेणेकरून त्यांना चांगली झोप येईल. दुधामध्ये ट्रायप्टोफॅनचे प्रमाण जास्त असते, जे स्लीप हार्मोन मेलाटोनिन वाढवण्यास मदत करते. पण याचा फायदा सर्वांना होईलच असे नाही.

दुधात पाण्याचे प्रमाण आणि खनिजे जास्त असतात. याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहते. दुधाचे सेवन केल्याने संपूर्ण शरीर हायड्रेटेड राहते. जर तुम्ही याचे दररोज सेवन केले तर ते तुमच्या दैनंदिन हायड्रेशनच्या गरजा पूर्ण करते. पण जर तुम्हाला तुमच्या आहारात पाण्याचा समावेश करायचा असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी दूध घेऊ नये.

जेवल्यानंतर दूध कधी प्यावे?

जेवल्यानंतर दुधाचे सेवन करावयाचे असल्यास साधारण एक ते दोन तास थांबावे. त्यामुळे अन्नाचे पचनही होते आणि पोटाला दूध पचायला वेळ मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe