लाईफस्टाईल

घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झाला आहे का? फक्त ‘हे’ उपाय करा, घरातून उंदीर होतील छूमंतर

Published by
Ajay Patil

घराची स्वच्छता आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करते व त्या पद्धतीने स्वच्छता देखील ठेवली जात असते. परंतु तरीदेखील घरामध्ये आपल्याला अनेक उपद्रवी कीटक व लहान सहान प्राण्यांचा  उपद्रव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

घरामध्ये प्रामुख्याने उंदीर तसेच पाल आणि झुरळ यांचा प्रादुर्भाव खूप घरांमध्ये दिसतो. या सगळ्या कीटक व प्राण्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करतात. परंतु तरीदेखील त्यांचे नियंत्रण करणे कठीण जाते. या सगळ्यांमध्ये जर आपण उंदीर पाहिला तर हा मोठ्या प्रमाणावर धान्य किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींचे नुकसान करतो.

त्यामुळे उंदरांना पकडण्यासाठी किंवा उंदरांना हाकलून लावण्यासाठी अनेक पद्धतीचे उपाययोजना केल्या जातात. परंतु सहसा आपल्याला याचा कुठल्याही पद्धतीचा फायदा होताना दिसून येत नाही. त्यामुळे आपण या लेखामध्ये असे काही सोपे उपाय बघणार आहोत जे उंदरांना घरात हाकलून लावण्यासाठी किंवा घरात येण्यापासून रोखण्यासाठी फायद्याचे ठरतील.

 हे घरगुती नैसर्गिक उपाय करा आणि उंदरांना पळवून लावा

1- कांद्याचा वापर करा उंदरांना पळवून लावण्यासाठी कांद्याचा वापर हा खूप फायद्याचा ठरतो. कांद्याचा वास हा उग्र स्वरूपाचा असतो.हाच कांद्याचा वास उंदरांना सहन होत नसल्याकारणाने कांद्याचा वास आल्याबरोबर उंदीर पळून जातात. त्यामुळे घरात ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात उंदीर असतात त्या ठिकाणी कांदा कापून ठेवणे गरजेचे असते.

2- लसणाचा वापर करा कांद्यासोबतच तुम्ही लसणाचा वापर करून देखील उंदरांना घरातून पळवून लावू शकतात. या उपायामध्ये लसूण बारीक करून एका छोट्या बॉटलमध्ये टाकावा आणि त्यात थोडे पाणी टाकून घ्यावे.हे पाणी ज्या ठिकाणी उंदीरांचे बिळ असतील त्या ठिकाणी शिंपडावे आणि घराच्या परिसरामध्ये थोडेसे टाकावे. या लसणाच्या पाण्याच्या वासाने देखील उंदीर घरात येत नाहीत.

3- लवंगाच्या तेलाचा वापर ज्या ठिकाणी घरामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो त्या ठिकाणी लवंग कापडामध्ये गुंडाळून ठेवावे. तसेच कापडावर थोडं लवंगाचे तेल शिंपडावे. त्यामुळे उंदीरांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि ते बिळातून बाहेर निघू लागतात व घराच्या बाहेर जातात.

4- मिरचीचा वापर मिरचीचा वापर देखील उंदीरांना पळून लावण्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. हा उपाय करताना सगळ्यात अगोदर लाल मिरच्या बारीक करून घ्याव्यात आणि मग चिली फ्लेक्स घेऊन पाण्यात मिक्स करावे. या पाण्याला एक उकळी येऊ द्यावी आणि पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये टाकावे. तुम्हाला उंदीर दिसला तर हे पाणी उंदरांवर शिंपडल्यावर त्यांना जळजळ होते व ते पळून जातात.

5- बटाट्याच्या पावडरचा वापर या उपायांमध्ये ज्या ठिकाणी घराच्या रस्त्यावर किंवा उंदराची बीळ असेल त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी घरात उंदीर असतात अशा ठिकाणी जर तुम्ही बटाट्याची पावडर टाकली तरी उंदीर घरातून पळून जातात.

Ajay Patil