अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- अनेकवेळा ग्राहक खरा फोन समजून बनावट स्मार्टफोन खरेदी करतात. तर अनेकदा असे देखील घडले आहे कि मूळ फोनच्या किमतीत बनावट आयफोन खरेदी करण्यात आला.
यामुळे ग्राहकाला मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागते. म्हणून आज आम्ही तुमहाला काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमच्याकडे असलेला आयफोन बनावट आहे, तर तो सहज ओळखता येईल.
बॉक्स उघडण्यापूर्वी तुम्ही आयएमईआय नंबर तपासावा. यासाठी तुम्हाला अॅपलच्या अधिकृत वेबसाइट https://checkcoverage.apple.com/in/en वर जावे लागेल.
येथे आयएमईआय क्रमांक टाकल्यानंतर तुमचे डिव्हाइस खरं आहे की नाही हे लगेच कळेल. तुमचे डिव्हाइस जुने असेल तर आयएमईआय नंबरऐवजी तुम्ही इतर पद्धतींचा अवलंब करू शकता.
यासाठी, iPhone X किंवा नवीन मॉडेल्सचे डिस्प्ले बेझल तपासणे सर्वात सोपे आहे. तळाशी एकसमान बेझल फक्त खऱ्या फोनमध्ये उपलब्ध आहे. बनावट उपकरणामध्ये जाड बेझल असतात.
अॅप्पल लाइटिंग पोर्ट जवळ पेंटलोब स्क्रू वापरते. स्क्रूच्या डोक्यावर पाच खोबणी असतील. यापेक्षा कमी म्हणजे डिव्हाइस बनावट आहे. याशिवाय तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अबाउटमध्ये जाऊन तुमच्या फोनचे व्हर्जन चेक करा.
जर डिव्हाइस अँड्रॉईड आवृत्ती सांगत असेल तर तो बनावट आयफोन आहे. जर तुम्ही फोनसाठी साइन इन करता तेव्हा तुम्हाला Google किंवा इतर खाते विचारले जात असेल, तर तो बनावट iPhone आहे.