Summer Safety Tips : संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढत आहे. सर्वत्र तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या समस्या देखील वाढल्या आहेत, अशास्थितीत नागरिकांनी स्वतःच्या बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. दरम्यान, आज आम्ही या लेखात उष्णतेच्या लाटे दरम्यान नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये हे सांगणार आहोत. प्रथम आपण उष्माघाताची लक्षणे जाणून घेणार आहोत.
उष्मघाताची लक्षणे
उष्मघाताचे लक्षण म्हणजे, मळमळ, उलटी, हातापायांत गोळे येणे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, डोळे लाल होणे, घाम न येणे, डीहायड्रेशन, चक्कर येणे, डोके दुखणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धावस्था.
उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?
-उन्हात फिरत असाल तर टोपी घालणे आवश्यक आहे.
-महत्वाचे काम नसेल तर उन्हात फिरणे टाळा, दुपारी 12 ते 4 दरम्यान शक्यतो घरात रहा.
-शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पित राहा.
-शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड शॉवर खाली अंघोळ करा, किंवा अंघोळीसाठी थंड पाणी वापारा.
-डीहायड्रेशन होऊ देऊ नये, पाणी पित राहावे.
-लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी प्यावे
काय करु नये?
-अल्कोहोल किंवा कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
-थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे टाळावे.
-थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखीसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
उष्मघाताच्या रुग्णाला प्रथमोपचार काय करावा?
-जर कोणाला उष्मघाताची समस्या जाणवली तर अशा रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा.
-रुग्णाला थोडे थोडे पाणी प्यायला द्यावे.
-उलटी झाली तर पाणी देऊ नये.
-रुग्णाला थंड ठिकाणी शक्यतो एसीमध्ये झोपवा.
-तसेच रुग्णाला लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जाणे.