लाईफस्टाईल

तुमचे एटीएम ‘अशा’ पद्धतीचं तर नाही ना? लाखो रुपयांना लागेल चुना , वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे अनेक लोक ऑनलाईन पैशांचे व्यवहार करतात. तर अनेकदा एटीएमचा वापर करतात. सध्या सणासुदीच्या दिवसात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

बाजारात असताना जर कॅशचे कमतरता लागली तर लोक पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करत आहेत. अशावेळी जर तुम्ही एटीएममधून पैसे काढणार असाल तर सावधानता बाळगा.

कारण जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर तुमची हजारो-लाखोंची फसवणूक होण्याची शक्यता आहे. याविषयी सविस्तर समजवून घेऊयात –

वेगवेगळे फंडे वापरून हॅकर्सकडे जातीये डिटेल्स

जर आपण सावधगिरी बाळगली नाही व भामट्यांकडे एटीएमचा पासवर्ड, कार्ड नंबर आणि सर्व डिटेल्स गेले तर ते तुमचं अकाऊंट सहज हॅक करू शकतात. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की फसवणुकीचा हा प्रकार कसा टाळायचा? चला पाहुयात –

फसवणुकीचा नवा फंडा

फसवणूक करणाऱ्यांनी आता फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. एटीएममध्ये कार्ड टाकताना हॅकर्स क्लोनिंग मशिन लावत असल्याचे प्रत्यक्षात समोर आले आहे. यामुळे तुमचा सीव्हीव्ही, कार्ड नंबर आणि इतर डिटेल्स हॅकर्सना उपलब्ध होतात.

सायबर पोलिसांनी देशाच्या विविध भागातून असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत. क्लोनिंग केल्यानंतर हॅकर्स एटीएम मशिनजवळ कॅमेरेही बसवत आहेत, त्याद्वारे त्यांना तुमचा पासवर्डही मिळत आहे.

काय खबरदारी घेतली पाहिजे ?

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम एटीएम मशिन व्यवस्थित पहा. त्यात काही छेडछाड केली आहे का किंवा त्यात काही इतर मशिन्स लावली आहेत का ते पहा. कारण क्लोन मशिन तुम्हाला दिसू शकते.

तसेच पासवर्ड टाकताना दुसरा हात बटणावर टाकावा जेणे करून तेथे कॅमेरा लावला असेल तरी तुमचा पासवर्ड रेकॉर्ड होणार नाही.

तुमचे पैसे ‘अशा’ पद्धतीने ठेवा

ज्या खात्यावरून तुम्ही एटीएम कार्ड वापरता किंवा फोन पे किंवा इतर अँप वापरता त्यामध्ये तुम्ही जास्त रक्कम ठेऊ नका. त्या खात्यातील रक्कम संपल्यावर दुसऱ्या प्राइमरी खात्यातून ट्रान्सफर करा. म्हणजेच तुमचं अकाऊंट हॅक झालं तरी हॅकर्स जास्त पैसे चोरू शकणार नाहीत.

काळजी हाच उपाय

सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या जमान्यात चोर सापडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे काळजी घेणे हाच यावर उपाय आहे. सर्वतोपरी गोपनीयता पालवी व काळजी घ्यावी.

Ahmednagarlive24 Office