असा होता जगताला पहिला टीव्ही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लंडन : कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा एखादी गोष्ट लोकांसमोर सादर करण्यात टीव्हीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. टीव्हीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने २१ नोव्हेंबरला सन १९९६मध्ये जागतिक टीव्ही दिन म्हणून घोषित केला होता.

आजच्या काळात टीव्ही सपाट झाला असून त्याचे अवजड व अगडबंब रूप आपल्या विस्मृतीत गेले आहे. सुमारे ९५ वर्षांपूर्वीच्या प्रवासात टीव्हीमध्ये अनेक बदल झाले आहे. टीव्हीचा शोध लागण्याआधी रेडियोचा काळ होता. हा असा काळ होता, ज्यात अनेक विरोधकांसह टीव्हीची सुरुवात झाली होती.

१९२४मध्ये पहिला टीव्ही बनला होता. त्यात खोके, पुठ्ठे व पंख्याच्या मोटरची मदत घेण्यात आली होती. स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या जॉन लोगी बेयर्ड यांनी टीव्हीचा शोध लावला होता.

टीव्हीला नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिमोटचा शोध यूजीन पोलीने लावला होता. १९५०मध्ये रिमोट कंट्रोलचा टीव्ही पहिला टीव्ही बाजारात आला. तेव्हा त्याचा रिमोट तारेद्वारे टीव्हीसोबत जोडलेला होता.

वायरलेस रिमोट कंट्रोलच्या टीव्हीची सुरुवा १९५५मध्ये झाली. १९५४मध्ये वेस्टिंगहाउसने पहिला रंगित टीव्ही संच बनविला. सुरुवातीला रंगित टीव्ही केवळ ५०० युनिट्सचे बनविले होते.

जास्त किंमत असल्याने बरीच वर्षे रंगित टीव्ही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर होते.

अहमदनगर लाईव्ह 24