Jyotish Tips : फक्त करा ‘हे’ छोटेसे काम! प्रसन्न होतील कुबेर देव, संपत्तीत होईल मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jyotish Tips : हिंदू धर्मामध्ये भगवान कुबेरांची संपत्तीचे देव म्हणून ओळख आहे. जर एखाद्या व्यक्तीला भगवान कुबेरांचा आशीर्वाद मिळाला तर त्याच्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते. त्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात कसलीच कमतरता भासत नाही.

इतकेच नाही तर वास्तूनुसार काही झाडे खूप शुभ मानली जातात. जर त्यांची योग्य काळजी ती घेऊन योग्य दिशेने लागवड केली तर भगवान कुबेर प्रसन्न होण्यास मदत होते. शिवाय त्यांना आर्थिक लाभही मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला भगवान कुबेरांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आजच हे रोप लावा.

कुबेर देवतेला प्रिय आहे ही वनस्पती

वास्तुशास्त्रानुसार सांगायचे झाले तर कुबेर देवतेचा क्रॅसुला वनस्पतीशी संबंध आहे. तसेच वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ही वनस्पती खूप लवकर पैसा आपल्याकडे आकर्षित करत असते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात क्रॅसुला वनस्पती लावली तर तुमच्यावर कुबेर देव प्रसन्न होतात. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. ही वनस्पती तुमच्या घरामध्ये लावली तर तुम्हाला सौभाग्य प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच ही वनस्पती एखाद्या व्यक्तीला कर्जातून मुक्त होण्यास देखील मदत करत असते.

कोणत्या दिशेला करावी लागवड?

जर तुम्हालाही भगवान कुबेर यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आता वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला हे रोप लावावे. जर तुम्ही या दिशेला क्रॅसुला वनस्पती लावली तर तुम्हाला आर्थिक संकटांपासून आराम मिळतो. तसेच व्यवसायात यश मिळवण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेला क्रॅसुला वनस्पती लावा.

घ्या ही काळजी

वास्तुशास्त्रानुसार भगवान कुबेर फक्त क्रसूला लावल्याने प्रसन्न होत नाही, तर क्रसुला लावत असताना काही काळजी देखील घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मतानुसार, क्रॅसुला वनस्पती उत्तर किंवा दक्षिण दिशेला लावण्यापूर्वी त्या ठिकाणी अंधार नसावा हे लक्षात ठेवावे. असे म्हणतात की सूर्य उगवल्यावर या वनस्पतीला जसे बहार येतो, तसेच तुमच्या घराचे कल्याण देखील होते.