Jyotish Tips : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा सर्वांना केलेल्या कर्माची फळ देत असतो. समजा तुम्ही चांगली कामे केली असतील तर तुम्हाला शनीदेव नक्कीच चांगले फळ देतील. परंतु जर तुम्ही वाईट कामे केले असतील तर शनीदेवाची व्रकदृष्टी तुमच्यावर पडू शकते. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असल्याने लोकांना त्यांची भीती वाटते.
अशातच आता शनी देव लवकरच मार्गी चालणार आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसून येईल. त्यापैकी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा होणार आहे. सध्या शनि त्याच्या स्वगृही कुंभ राशीमध्ये आहेत. जाणून घेऊयात सविस्तर.
वृषभ रास
ज्योतिष शास्त्रानुसार सांगायचं झालं तर शनि देव सध्या प्रतिगामी वृषभ राशीत शुभ स्थितीत आहे. अशा स्थितीत शनी देवाची ग्रहस्थिती योग्य दिशेला असेल तर वृषभ रास असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये अभूतपूर्व यश मिळेल. तसेच त्यांच्या नोकरी-व्यवसायातही खूप प्रगती दिसून येईल. शनीच्या मार्गामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या व्यवसायात खूप नफा होईल. त्याशिवाय आरोग्याच्या दृष्टीने शनीचा मार्ग खूप शुभ मानला जातो.
कुंभ रास
कुंभ रास असणाऱ्या लोकांना शनि थेट कुंभ राशीत असल्यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे. या दरम्यान ज्या ठिकाणी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला शश नावाच्या राजयोगाचा लाभही होणार आहे. इतकेच नाही तर आता कुंडलीमध्ये शश योग तयार झाल्याने कुंभ राशीच्या लोकांचे आणखी व्यक्तिमत्व आकर्षक बनू शकते. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्याशिवाय त्यांना व्यापार-व्यवसायाच्या क्षेत्रात किंवा भागीदारीमध्ये आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांवरही शनीच्या मार्गाचा प्रभाव दिसून येईल. जर असे झाले तर सिंह रास असणाऱ्या लोकांच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून त्यांना कायमची सुटका मिळेल. इतकेच नाही तर त्यांची आर्थिक क्षेत्रात प्रगती अपेक्षित आहे. न्यायिक प्रकरणांमध्येदेखीलही त्यांचा खूप मोठा फायदा होईल.