Benefits Soaked Chickpeas : काबुली चणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे स्वादिष्ट असण्यासोबतच शरीराला अनेक फायदे देखील देतात. बरेच लोक ते उकळवून किंवा त्याची भाजी करून खाणे पसंत करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, भिजवलेले चणे खाणे आपल्या शरीरासाठी खूप फसायदेशीर असते.
काबुली चण्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने पचनक्रिया ते मजबूत होतेच, पण सर्वात मोठा फायदा म्हणजे याने वजनही कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच हाडेही मजबूत होतात. हे सकाळच्या नाष्ट्यामध्ये सहज खाल्ले जाऊ शकतात.
मसल्स मजबूत बनवण्यासोबतच चणे खाल्ल्याने होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही नक्कीच याचा आहारात समावेश केला पाहिजे. आजच्या या लेखात आपण त्याच्या इतर फायदनांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग…
भिजवलेले काबुली चणे खाण्याचे फायदे :-
-भिजवलेले काबुली चणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. त्यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही, आणि आपण अतिरिक्त अन्न खाणे टाळतो. त्यामुळे आपले वजन वाढत नाही, आणि नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-भिजवलेले चणे डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. ते खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि डोळेही निरोगी राहतात. भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होतात. तसेच चणे खाल्ल्याने रेटिनाच्या समस्याही थांबतात.
-भिजवलेले चणे खाल्ल्याने पोटातील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामध्ये आढळणारे फायबर मल मऊ करून पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने अपचन, गॅस आणि ऍसिडिटीचे विकारही दूर होतात आणि भूकही उघडपणे जाणवते.
-भिजवलेले चणे खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, हाडे मजबूत करते. त्यासोबतच होणाऱ्या त्रासांपासूनही आराम मिळतो. चणामध्ये कॅल्शियम भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवते.
-भिजवलेले चणे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि हंगामी आजारांचा धोका अनेक पटींनी कमी होतो. चणामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराला
अॅलर्जी आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्याची ताकद देते, आणि आपण लवकर आजारी पडत नाही.