लाईफस्टाईल

Kia Sportage : लवकरच लॉन्च होतेय Kia ची ‘ही’ नवीन कार, Alcazar व Hector ला देणार टक्कर

Published by
Ahmednagarlive24 Office

Kia Sportage : कार मार्केटमध्ये सध्या 5 सीटर फॅमिली कारला खूप डिमांड वाढली आहे. आता या सेगमेंटमध्ये एक नवीन कार येणार आहे. ही कार ह्युंदाई अल्काझार आणि एमजी हेक्टर ला टक्कर देईल.

या कारमध्ये 1999 सीसीचे दमदार इंजिन असणार आहे. लवकरच Kia ची नवी Sportage लॉन्च होतेय. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एसयूव्ही कारप्रेमी या कारची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम :- ही बिग साइज लक्झरी एसयूव्ही कार असेल. यात टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमसह मोठे टायर आणि अलॉय व्हील्स मिळतील. Kia Sportage जुलै 2024 पर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने या कारची डिलिव्हरी डेट आणि किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कारमध्ये आरामदायक सीट आणि हेवी सस्पेंशन असेल.

सहा एअरबॅग आणि सनरूफ :-  किआ स्पोर्ट्झ ची प्रारंभिक किंमत 25 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. याचे पॉवरफुल इंजिन 181 बीएचपीपर्यंत पॉवर देईल. ही डिझेल कार सुमारे 192 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल. या कारमध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग, एक सनरूफ आणि पॉवरफुल ब्रेकिंग सिस्टिम असेल.

Carens :-  कियाची बिग साइज कार Carens सध्या बाजारात उपलब्ध आहे. ही कार सहा आणि सात सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10.45 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी, लक्झरी (ओ) आणि लक्झरी प्लस अशा सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

एबीएस व इलेक्ट्रोनिक स्टॅबिलिटी कंट्रोल :- या कारमध्ये टर्बो इंजिनही देण्यात आले आहे. 1.5 लीटर पेट्रोल इंजिन 115 PS पॉवर आणि 144 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार आठ मोनोटोन कलर मध्ये उपलब्ध आहे.

या कारमध्ये 216 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. किआ केरेन्समध्ये 10.25 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. कारमध्ये ऑल व्हील डिस्क ब्रेक, एबीएस आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल देण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office