Benefits of kiwi : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे किवी, अनेक आरोग्य समस्या होतील दूर…

Content Team
Published:
Benefits of kiwi

Benefits of kiwi : फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. फळांमध्ये किवीचे एक वेगळे महत्व आहे, हे फळ इतर फळांपेक्षा थोडे महाग असते पण याचे फायदे देखील खूप आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, पोटॅशियम इत्यादी घटक आढळतात. म्हणून याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.

तसे बघायला गेलो तर उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनचा सर्वाधिक जास्त धोका असतो, अशास्थितीत त्याचे सेवन केल्याने शरीरात पाण्याच्या कमतरतेपासून बचाव होतो, शिवाय शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते. हे जरी हे फळ आपण प्रत्येक ऋतूत खाऊ शकतो, आजच्या या लेखात आपण किवी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग…

किवी फळ खाण्याचे फायदे :-

-आजारपणामुळे शरीरात प्लेटलेट्सची तीव्र कमतरता असते तेव्हा डॉक्टर किवी खाण्याचा सल्ला देतात. डेंग्यूच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. हे फळ रोज खाल्ल्याने प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने वाढवता येते.

-किवीच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. हे अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतेच, तर बदलत्या हवामानात आणि या उष्णतेमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासही मदत करते.

-पचनक्रिया मजबूत करण्यासोबतच किवीच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचनाच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर उन्हाळ्यात तुम्ही या फळाचा आहारात नक्कीच समावेश करू शकता.

-उच्च रक्तदाबाची समस्या असो किंवा स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करणे असो, प्रत्येक बाबतीत किवीचे सेवन फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी हे फळ अवश्य खावे. याशिवाय हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंचे आरोग्य देखील सुधारते.

-आजच्या काळात लहान वयातच लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. किवीच्या सेवनाने दृष्टीही सुधारते, त्यामुळे जर तुम्हालाही वाढत्या वयासोबत चष्म्याचा नंबर वाढवायचा नसेल तर तुम्ही त्याचा आहारात नक्कीच समावेश करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe