लाईफस्टाईल

Dates Benefits : हृदयाच्या आरोग्यापासून ते मेंदूपर्यंत, जाणून घ्या खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे !

Published by
Renuka Pawar

Dates Benefits : खजूर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. खजूराच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. यामध्ये फायबर, प्रोटीन, आयरन आणि व्हिटॅमिन बी6 मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने शरीर निरोगी आणि सक्रिय राहते. खजूर तुम्ही कोरडे किंवा भिजवूनही खाऊ शकता. पण जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही खजूर भिजवून खाऊ शकता.

रात्रभर खजूर भिजवून खाल्ल्याने त्याच्या पृष्ठभागावरील टॅनिन निघून जातो. त्यामुळे पचनक्रिया सुलभ होते. तसे याचे नियमितपणे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे खाल्ल्याने शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोकाहा कमी होतो. याचे आणखी काय फायदे आहेत, चला जाणून घेऊया.

-खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स, पॉलीफेनॉल्स, फायटोस्ट्रोजेन्स आणि स्टेरॉल्स सारख्या फायटोकेमिकल्स सारखे घटक आढळतात. हे सर्व घटक शरीराला शक्ती प्रदान करतात. आणि आपण दिवसभर उत्साही राहतो.

-काजूराच्या नियमित सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढू लागते. याशिवाय यामध्ये आढळणाऱ्या कॉपर, झिंक, फायबर आणि पोटॅशियमच्या मदतीने शरीर हृदयविकार आणि मधुमेहाच्या धोक्यापासून लांब राहते.

-खजुराचे सेवन मेंदूतील अमायलोइड बीटा प्रोटीनची क्रिया नियंत्रित करण्यास मदत करते, याशिवाय हे मेंदूमध्ये प्लेग तयार होण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. प्लेग हा चरबीचा एक प्रकार आहे. तसेच याच्या सेवनाने स्मरन शक्तीही वाढते.

-खजूर खाल्ल्याने शरीराला ऑस्टिओपोरोसिसच्या धोक्यापासून संरक्षण मिळते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि तांबे शरीराला मजबूत बनवतात. यामुळे फ्रॅक्चरचाही धोका कमी होतो.

-खजूर खाल्ल्याने शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होऊ शकते. अँटीऑक्सिडंटने भरपूर खजूर खाल्ल्याने शरीर अनेक प्रकारच्या संसर्गांपासून सुरक्षित राहते. त्यात उपस्थित फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स आणि फिनोलिक अ‍ॅसिड असतात. यामुळे कर्करोग, अल्झायमर, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून शरीराचे संरक्षण होते.

-जर तुम्ही दररोज 2 ते 3 भिजवलेल्या खजूर खाल्ले तर कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये होणारा अडथळा टाळता येतो. यामध्ये आढळणारे फेनोलिक अ‍ॅसिड हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्यापासून रोखते. त्याचे नियमित सेवन शरीर निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

-खजूरमध्ये लोह आणि तांबे मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होऊ शकते. अशा स्थितीत महिलांनी रोज कोणत्याही प्रकारे खजूरचा आहारात समावेश केला तर हिमोग्लोबिनची पातळी तर वाढू लागतेच पण अनियमित मासिक पाळीही नियमित होते. यासोबतच हे रक्त शुद्ध करण्यातही मदत करते.

-भरपूर फायबर असल्याने खजूर खाल्ल्याने पचनाच्या समस्या आपोआप दूर होतात. जर तुम्ही खजूर रात्रभर भिजवून खाल्ल्यास ते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकू शकते. याशिवाय पोटातील दुखणे आणि पेटके यापासूनही आराम मिळतो.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar