Dark Chocolate Benefits : आजार अनेक, उपाय एकच! जाणून घ्या डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dark Chocolate Benefits : चॉकलेट कोणाला आवडत नाही, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला चॉकलेट खूप आवडते. काही काळापूर्वी चॉकलेटचे मर्यादित प्रकार मिळायचे पण, आजच्या काळात सर्व प्रकारची चॉकलेट्स उपलब्ध आहेत. आधी लोकांचा असा समज होता चॉकलेट खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहचते, पण बाजारात असे पण चॉकलेट आहेत, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो, आजच्या या लेखात आपण डार्क चॉकलेटचे फायदे जाणून घेणार आहोत.

खरं तर डार्क चॉकलेटचे अनेक फायदे आहेत. एनसीबीआयच्या (National Center for Biotechnology Information) संशोधनानुसार, डार्क चॉकलेटमध्ये एपिकेटचिन, कॅटेचिन आणि प्रोसायनिडिन्स सारखे फ्लॅव्हॅनॉल असतात. यामध्ये अँटीहाइपरटेन्सिव्ह, अँटीप्लेटलेट, अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी प्रभाव आहेत. डार्क चॉकलेट हा कोणत्याही शारीरिक समस्येवर इलाज नाही. या समस्यांना रोखण्यासाठी आणि त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी हे काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते.

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे :-

-उच्च रक्तदाब, प्लेटलेट निर्मिती, ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ हे कार्डिओ-मेटाबॉलिक जोखीम घटक मानले जातात. या समस्येत डार्क चॉकलेटचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते, याचे सेवन कमी प्रमाणात करणे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते.

-बहुतेक लोक आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करत असतात. सततच्या तणावामुळे नैराश्य येऊ शकते. या समस्येमध्ये मूड स्विंग, नैराश्य, राग आणि चिडचिड अशी लक्षणे जाणवतात. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी किंवा मूड ठीक करण्यासाठी डार्क चॉकलेट खूप फायदेशीर ठरते.

-खरं तर, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की तीन दिवस डार्क चॉकलेट खाल्ल्याने काही लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे सुधारतात. त्याचवेळी, एनसीबीआयच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात डार्क चॉकलेट नैराश्याच्या लक्षणांवर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

-तसेच वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील डार्क चॉकलेटचे फायदे दिसून आले आहेत. एनसीबीआयच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या दोन वेगवेगळ्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, कमी चरबीयुक्त आहारासोबत प्लांट स्टेरॉल्स आणि कोको फ्लेव्हॅनॉल असलेले डार्क चॉकलेट सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. यासोबतच हृदयाचे आरोग्य आणि ब्लड प्रेशरमध्येही सुधारणा दिसून येते.

-बदलत्या हवामानामुळे आपण लवकर आजारी पडतो. या काळात सर्दी देखील होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले जाऊ शकते. मुळात, डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन नावाचे रसायन असते. हा पदार्थ श्वसनमार्गाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. या समस्यांमध्ये सर्दी आणि फ्लूचाही समावेश होतो.

-उच्च रक्तदाबाच्या समस्येवर डार्क चॉकलेटही उपयुक्त ठरू शकते, डार्क चॉकलेटमध्ये उच्च रक्तदाब कमी करणारा प्रभाव असतो, ज्यामुळे त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो.

जास्त डार्क चॉकलेट खाणे हानिकारक ठरू शकते

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, त्यामुळे त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर लोकांनी त्याचे जास्त सेवन करू नये, कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. मुळात डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात.

यामध्ये, जलद हृदय गती, डोकेदुखी, मळमळ, छातीत जळजळ, चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवू शकते.