लाईफस्टाईल

‘लै’ भारी ! आता WhatsApp चॅटिंगसाठी नंबर असण्याची गरज नाही, केवळ युजरनेमवर होईल काम

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : व्हाट्सएप हा एक लोकप्रिय मेसेजिंग प्लेटफॉर्म आहे. WhatsApp वर जर एखाद्या नवीन व्यक्तीशी चॅटिंग करायची असेल तर त्याचा फोन नंबर असणं गरजेचं असत. तो नम्बर सेव्ह करून ठेवावा लागतो. पण आता याची देखील गरज पडणार नाही.

आता फोन नंबर ऐवजी फक्त युजरनेम जरी असेल तरी चॅटिंग करता येणार आहे. इन्स्टाग्रामसारख्या या फीचरच्या मदतीने युजर्सला चांगली प्रायव्हसी मिळेल. मोबाइल नंबर शेअर न करताच चॅटिंग व इतर कामे होतील. या नवीन बदलांची माहिती ब्लॉग साइट WABetaInfo ने दिली आहे. हा नवीन बदल Android Beta या व्हर्जनसाठी टेस्ट साठी रोल आउट केले जात आहे. हे फीचर युजर्सना त्यांचे युजरनेम सेट करून इतरांशी शेअर करण्याचा पर्याय देण्यात येईल.

* प्रोफाईल सेक्शनमध्ये नवे पर्याय दिसतील

युजर्सला ऍपच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये युजर सेट करण्याचा ऑप्शन देण्यात येणार आहे. या यूजरनेम मध्ये अल्फाबेट्स, नंबर्स आणि स्पेशल कॅरॅक्टर वापरली जाऊ शकतात आणि प्रत्येक युजर्सनेम एकमेकांपासून वेगळा असणे आवश्यक आहे.

* युजर्सनेमद्वारे अशी सुरु करा चॅटिंग

एखाद्याशी चॅटिंग सुरू करण्यासाठी फक्त यूजरनेम वापरता येईल आणि सदर व्यक्तीचा पर्सनल नंबर हाईड केलेला असेल. आपला फोन नंबर शेअर करायचा की लपवायचा हे युजरवर अवलंबून आहे. इतर व्हॉट्सअॅप चॅटप्रमाणेच हे चॅटही एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील.

बीटा टेस्टिंगनंतर हे फीचर सर्व युजर्ससाठी आणले जाऊ शकते. नव्या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास आपला नंबर चोरीला जाण्याची किंवा त्रास होण्याची भीती नसेल. इतर सदस्यांना फक्त युजरनेम दिसेल. त्यामुळे फोन नंबरचा चुकीचा वापर केला जाणार नाही.

Ahmednagarlive24 Office