Lakshmi Narayan Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या संक्रमणामुळे कधी-कधी एका राशीत दोन ग्रह एकत्र येऊन राजयोग तयार होतो. असाच एक योगायोग मे महिन्यात मेष राशीत तयार होणार आहे.
सुख, संपत्ती आणि वैभवाचा कारक शुक्र मीन राशीतून बाहेर पडून 24 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल आणि 10 मे रोजी बुध देखील मेष राशीत प्रवेश करेल, अशा स्थितीत हे दोन्ही ग्रह मेष राशीत एकत्र येत असल्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. मेष राशीत तयार झालेला हा राजयोग काही राशींसाठी खूप शुभ मानला जात आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
मिथुन
बुध, शुक्राचे संक्रमण आणि लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतात. या काळात उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना मे महिन्यात काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क
शुक्र, बुध आणि लक्ष्मी नारायण राजयोग राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतात. नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो.
कौटुंबिक संबंध मजबूत होतील, आर्थिक स्थिती सुधारेल, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सध्या मीन राशीमध्ये बुध-शुक्र युती आहे, अशा स्थितीत लक्ष्मी नारायण आहे, यामुळे लोकांना विशेष लाभही होईल. मुलांना परदेशात पाठवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. संयमाने पुढे जात राहा…
मेष
शुक्र बुध आणि लक्ष्मी नारायण राजयोग लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतात. करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात पैशाच्या गुंतवणुकीचे फायदे मिळतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. अविवाहित लोकांसाठी नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो.
बेरोजगारांसाठी नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळू शकते. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन स्त्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.
लक्ष्मी नारायण राजयोग म्हणजे काय?
ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्त्व दिले गेले आहे, ते खूप शुभ मानले जाते. जेव्हा बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो, या योगाने लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो, धनधान्यांचा वर्षाव होतो.