YouTube वरून चॉकलेट बनवायला शिकला आणि आज उभी केली करोडोंची कंपनी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Digvijay Singh : आज आपल्या देशात दररोज कोणी ना कोणी स्वत:चा स्टार्टअप किंवा बिझनेस सुरू करत आहे. त्यामुळे आपल्या देशात स्टार्टअप्सची संख्याही वाढत आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत स्टार्टअप्स आणि व्यवसायांचाही मोठा वाटा आहे,

म्हणूनच सरकार देखील प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तर आज आम्ही तुमच्यासाठी स्टार्टअप्सच्या दुनियेतील एक जबरदस्त यशोगाथा घेऊन आलो आहोत.

2020 च्या कोरोना महामारीच्या काळात भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी एका 16 वर्षाच्या मुलाने युट्युबवर चॉकलेट कसे बनवायचे हे शिकायला सुरुवात केली.

तिथून चॉकलेट कसे बनवायचे हे तो शिकला अन पाहता पाहता त्या 16 वर्षीय मुलाने आज कोट्यवधींची कंपनी बनवली आहे. येथे आपण ज्याविषयी बोलत आहोत ते आहेत दिग्विजय सिंह.

त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी चॉकलेट व्यवसाय सुरू केला आणि आज वयाच्या 19 व्या वर्षी ते आपल्या व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. दिग्विजय यांच्या कंपनीचे नाव Saraam असे आहे.

YouTube वर चॉकलेट बनवायला शिकला

दिग्विजय सिंह यांना लहानपणापासूनच चॉकलेटसारख्या गोष्टींची आवड होती आणि त्यांना त्या कशा बनवायच्या हे ही शिकायचे होते. पण त्यांना या गोष्टींसाठी वेळ मिळू शकला नाही, पण 2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून तो युट्युबवरून चॉकलेट बनवायला शिकू लागला.

YouTube वर चॉकलेट बनवायला शिकत असताना त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना आपल्या हाताने बनवलेलं चॉकलेट द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी बनवलेले चॉकलेट सर्वांना आवडू लागले. सुरुवातीला जेव्हा त्याने चॉकलेट बनवायला सुरुवात केली तेव्हा तो अनेकदा अपयशी ठरला पण त्याने चॉकलेट बनवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि लोकांना त्याचे चॉकलेटही आवडू लागले.

व्यवसाय करण्यास प्रेरणा

दिग्विजय जेव्हा युट्युब वरील व्हिडिओच्या मदतीने चॉकलेट बनवायला शिकला तेव्हा अनेकांनी त्याला स्वत:चा चॉकलेट व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली. सुरुवातीला दिग्विजय याने छंद म्हणून हे काम करायला सुरुवात केली,

पण नंतर त्यांना वाटलं की ते आपली चॉकलेट्स कार शोरूम आणि हॉटेल मालकांना विकू शकतात. त्याच वेळी काही चांगल्या चवीची चॉकलेट्स बाजारात मिळत नसल्याचे पाहून त्यांनी स्वत: एका युनिक चवीची चॉकलेट बनवण्यास सुरवात केली व येथूनच त्यांची कंपनी सुरू झाली.

आज कोट्यवधी रुपये कमवत आहे

2021 मध्ये दिग्विजय यांनी आपल्या नव्या चॉकलेट फ्लेवर्सची Saraam नावाची कंपनी सुरू केली आणि त्याच वर्षी दिग्विजय यांना एका कार कंपनीकडून 1000 चॉकलेट्सची ऑर्डरही मिळाली. त्यानंतर दिग्विजय यांनी मागे वळून पाहिले नाही. आज त्यांची कांपनी करोडोंचा व्यवसाय करत आहे.