लाईफस्टाईल

Inshorts Success Story : कॉलेज सोडून फक्त फेसबुक पेजवरून बनवली करोडोंची कंपनी, तीन मित्रांनी उभी केली ३७०० कोटींची ‘इनशॉर्ट’ कंपनी

Published by
Ahmednagarlive24 Office

Inshorts Success Story : सध्या आपला देश भारत स्टार्टअपच्या जगात झपाट्याने प्रगती करत आहे. हेच कारण आहे की आज आपल्या देशात १०० हून अधिक युनिकॉर्न स्टार्टअप्स तयार झाले आहेत .

म्हणजेच आपल्या देशात असे १०० हून अधिक स्टार्टअप्स आहेत की ज्यांची व्हॅल्यू १०० कोटींहून अधिक आहे.

आज येथे आपण स्टार्टअप्सच्या दुनियेतील एका व्यक्तीची कहाणी पाहणार आहोत ज्याने आयआयटी कॉलेज सोडले आणि फेसबुक पेजच्या मदतीने कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे. येथे आपण इनशॉर्ट्स कंपनीचे संस्थापक अझहर इक्बाल यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.

अझरने आपल्या फेसबुक पेजच्या मदतीने इनशॉर्ट्स ची सुरुवात केली, ज्याची व्हॅल्यू आज ३७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आजच्या लेखात आपण इनशॉर्ट्स सक्सेस स्टोरीबद्दल वाचणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की अझरने फेसबुकच्या मदतीने एवढी मोठी कंपनी कशी तयार केली.

अशी झाली इन्शॉर्ट्सची सुरुवात

आयआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अझर इक्बाल, दीपित पुरकायस्थ आणि अनुनय अरुणव या तीन मित्रांनी २०१३ मध्ये फेसबुक पेजच्या माध्यमातून इन्शॉर्ट्स सुरू केले. फेसबुक पेजवर चांगला प्रतिसाद मिळाल्याने लोकांना त्यांच्या सेवेचा सहज वापर करता यावा यासाठी त्यांनी लोकांसाठी एक इनशॉर्ट्स अॅप्लिकेशनही तयार केले.

तीन मित्रांनी इनशॉर्ट्स सुरू केले कारण २०१३ च्या सुमारास जेव्हा देशभरात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत होता, तेव्हा लोक इंटरनेटवर जागतिक बातम्या वाचू लागले, पण त्या न्यूज खूप मोठ्या असायच्या कि ज्या वाचायला बराच वेळ लागायचा.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अझर इक्बालने आपल्या मित्रांसोबत इनशॉर्ट्स प्लॅटफॉर्म सुरू केला. इनशॉर्ट्स अॅपवर तुम्हाला जगातील सर्व बातम्या अवघ्या 60 शब्दात मिळतात, जेणेकरून तुम्ही कमी वेळात कोणतीही बातमी सहज वाचू शकता.

इतके लोक करतात Inshorts चा वापर

आजच्या काळात इन्शॉर्ट्स ही मीडिया इंडस्ट्रीतील एक नामांकित कंपनी बनली आहे. या अॅपला आतापर्यंत एक कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, इनशॉर्ट्स प्लॅटफॉर्म (वेबसाइट+ अॅप्लिकेशन) वापरणाऱ्यांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे.

आज ३७०० कोटी रुपयांची कंपनी बनली

कंपनीचे तीन संस्थापक अझहर इक्बाल, दीपित पुरकायस्थ आणि अनुनय अरुणव यांच्या मेहनतीमुळे आज इनशॉर्ट्स कंपनीचे मूल्य ३७०० कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी इनशॉर्ट्स कंपनीचे काम आणि त्यांचे भविष्यातील प्लॅन पाहून २०१३ मध्ये पहिला फंडिंग दिला होता आणि आतापर्यंत कंपनीला एकूण ११९ मिलियन डॉलरचा फंडिंग मिळाला आहे. या कंपनीचे मूल्य ३७०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

भारतातील लोकप्रिय टीव्ही शो शार्क टँक इंडिया सध्या त्याच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे, कारण तिसरा सीझन लवकरच टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. शार्क टँक इंडियाशी संबंधित आणखी एक बातमी येत आहे की, तिसर्‍या सीझनमध्ये शार्क टँक इंडियाचे जज म्हणून इनशॉर्ट्स कंपनीचे संस्थापक अझहर इक्बाल असतील. जिथे तुम्हालाते इतर जज सोबत नवीन स्टार्टअप्सना फंडिंग करताना दिसतील.

Ahmednagarlive24 Office