Health Tips : छोट्याशा लिंबाचे अद्भुत फायदे, अनेक समस्यांवर ठरतो गुणकारी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात लिंबू आढळतोच, तसे लिंबू हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे फळ मानले जाते, जे आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे, हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे फळ म्हणूनही ओळखले जाते. लिंबू अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांपासून आरोग्याशी संबंधित इतर समस्यांमध्ये तुम्ही लिंबू वापरू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. पोषक तत्वांनी युक्त लिंबूचे अनेक फायदे आहेत. आजच्या या लेखात आपण याच्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत, चला…

लिंबूचे चमत्कारिक फायदे :-

-जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर, लिंबाचा रस खूप फायदेशीर मानला जातो, वजन कमी करण्यासाठी एक ग्लास कोमटपाण्यात एक लिंबू पिळा आणि एक चमचा मध मिसळा. याचे रोज सेवन केल्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

-लिंबू पचनाच्या समस्यांवरही खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला पचनाच्या समस्या जाणवत असतील तर, तुम्ही लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात एक लिंबू आणि थोडे मीठ टाकून त्याचे सेवन करा, असे केल्यास तुम्हाला पचनाच्या समस्यांपासून लगेच अराम मिळेल.

-जर तुम्हाला मळमळत असेल तर तुम्ही अर्धा कप पाण्यात लिंबाचा रस, जिरे आणि वेलचीचे दाणे मिसळून ते पेय पियू शकता. यामुळे तुम्हाला काही प्रमाणात आराम मिळेल.

-लिंबू हे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे, अनेकांना त्वचेवर डाग आणि मुरुमांच्या समस्या जाणवतात, यावर उपाय म्हणून तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा मलईमध्ये एक चतुर्थांश लिंबू पिळून घ्या आणि ही पेस्ट दररोज चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याचा रंग साफ होतो आणि मुरुमांपासूनही सुटका होते.

-अनेकांना केस गळतीही समस्या असते, या समस्येवरही लिंबू खूप फायदेशीर ठरते. यासाठी पिकलेल्या केळ्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि नियमितपणे डोक्याच्या मुळांवर लावा, यामुळे केस गळती कमी होईल आणि लवकर टक्कल पडणार नाही.

-अनेक प्रकारच्या वेदनांवर लिंबू खूप फायदेशीर आहे. पोटदुखी, दातदुखी, सांधे आणि कान दुखण्यासाठी देखील लिंबाचा रस खूप फायदेशीर आहे.

-सांधेदुखीवर देखील लिंबू खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबाच्या रसाने मालिश करणे किंवा लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते.