Life Insurance : सावधान! घाईघाईत लाइफ इन्शुरन्स घेताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Life Insurance : आपल्या जीवनात पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नसते. अपघात, गंभीर आजारांचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे. परंतु आता तुम्ही लाइफ इन्शुरन्स घेऊन आयुष्यभर निश्चिंत राहू शकता.त्यामुळे आता तुमच्यासाठी लाइफ इन्शुरन्स हा पर्याय आर्थिक जोखीम उचलण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल.

आरोग्य विम्यामध्ये कंपनी आरोग्याशी निगडित आपत्कालीन परिस्थितीत पॉलिसीधारकाला आर्थिक भरपाई देत असते. पॉलिसीधारकाच्या वैद्यकीय खर्चाची पूर्तता करणे हे या विम्याचे मूळ उद्दिष्ट आहे. हे ;लक्षात ठेवा की कव्हरेज एका निश्चित विमा रकमेच्या अधीन असते. यात गंभीर आजारांवरील उपचार कव्हर केले जातात. परंतु हा विमा घेताना काही चुका करू नये.

बजेटनुसार निवडा प्लॅन

ज्यावेळी तुम्ही हा प्लॅन निवडता त्यावेळी तुम्हाला नेहमी तुमच्या बजेटकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक फायनान्स वेबसाइट कॅल्क्युलेटरची मदत घेता येईल.

कुठे मिळेल ही पॉलिसी?

पॉलिसी घेत असताना बऱ्याच वेळा आपल्या मनात प्रश्न येतो की आपण ही पॉलिसी कुठून खरेदी करावी? तुम्ही ही पॉलिसी अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसेच तुम्ही कोणत्याही एजंटकडून कोणतीही पॉलिसी कधीही खरेदी करू नये. तुम्ही ती ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता.

खरेदी करा अनेक कंपन्यांकडून पॉलिसी

तुम्ही एका कंपनीऐवजी 2 ते 3 कंपन्यांची पॉलिसी घ्यावी. तुम्हाला जास्त फायदा होईल. उदाहरणार्थ, जर एखादी कंपनी तुम्हाला काही फायदे देत नसल्यास तुम्ही दुसऱ्या कंपनीकडूनही विमा प्लॅन घेऊ शकता.

कंपन्यांशी करा तुलना

ज्यावेळी तुम्ही विमा पॉलिसी घेत असता त्यावेळी तुम्ही त्या पॉलिसीची अनेक कंपन्यांशी तुलना करू शकता. तुम्ही सर्वोत्तम विमा प्लॅन निवडू शकता. कशीही फक्त एकाच कंपनीला महत्त्व देऊ नका. अनेक कंपन्यांशी तुलना करून पॉलिसी खरेदी करा.

पॉलिसीचा कालावधी पहा

तुम्ही जे काही पॉलिसी खरेदी करता त्याचा कालावधी तपासणे खूप गरजेचा आहे. अनेकजण निवृत्ती सुरक्षित करण्यासाठी पॉलिसी खरेदी करत असतात, त्यामुळे आता तुम्हाला निवृत्तीनंतरही विम्याचा लाभ मिळतो की नाही हे पाहावे लागणार आहे.