Lifestyle News : टी-शर्टमधील ‘टी’ चा अर्थ माहितेय का? जाणून घ्या त्यामागील रंजक इतिहास


प्रत्येक देशाचा पोशाख हा वेगवेगळा आहे. मात्र आजकाल सर्वच देशांमध्ये टी-शर्टचा वापर केला जातो. मात्र या टी-शर्टचा खूप जुना आणि रंजक इतिहास आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lifestyle News : तरुणांमध्ये टी-शर्टची खूप क्रेझ आहे. ही क्रेझ आजच नाही तर अनेक दिवसांपासून आहे. मात्र टी-शर्टचा एक वेगळाच रंजक इतिहास आहे. टी-शर्टचा इतिहास हा बराच जुना आहे. प्रत्येक देशाचा पोशाख हा वेगवेगळा आहे. मात्र आजकाल टी-सर्वच देशांमध्ये परिधान केल्याचे चित्र पाहायला मिळते.

मात्र टी-शर्ट हा प्रत्येक देशात परिधान केला जातो. टी-शर्ट हे एक असे वस्त्र आहे जो स्त्रिया आणि पुरुष दोघेही वापरू शकतात. टी-शर्ट परिधान करणे हे अगदी सोपे असल्याने अनेकजण त्याचा वापर करत असतात. टी-शर्ट हे आरामदायी वस्त्र असल्याने उन्हाळ्यात अनेकजण तो परिधान करतात.

सर्वसामान्य लोकांची वस्त्रामधील सर्वात पहिली पसंती असणाऱ्या टी-शर्टचा एक वेगळा इतिहास आहे. तसेच टी-शर्टचा इतिहास देखील खूपच जुना आहे. टी-शर्ट 19 व्या शतकात अंडर शर्ट म्हणून सुरू झाले.

पण 20 व्या शतकाच्या मध्यात, ते अंडर शर्टच्या पलीकडे सामान्य वापराच्या कपड्यांमध्ये गेले. मग तो ‘उंच शर्ट’ म्हणून ओळखला जायचा, ज्याची लांबी गुडघ्यापर्यंत होती. पण 20 व्या शतकाच्या शेवटी, जेव्हा ते पॉप संस्कृतीत दाखल झाले, तेव्हा ते टी-शर्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

टी-शर्टमधील ‘टी’ चा अर्थ

काही दशकांपूर्वी टी-शर्टला ‘टॉल शर्ट’ आणि ‘टँक टॉप’ या नावानी ओळखले जात होते. म्हणूनच टी-शर्टमधील ‘टी’ चा पहिला अर्थ ‘उंच’ असा आहे. पण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा ‘टी-शेप’. त्याचा आकार ‘टी’ आकारासारखा आहे. म्हणूनच त्याला टी-शर्ट असे म्हणतात.

टी-शर्टमध्ये ‘टी’ म्हणजे काय याचा मनोरंजक इतिहास

20 व्या शतकाच्या सुरुवातीला स्पॅनिश-अमेरिकन युद्धादरम्यान अमेरिकन सैनिक हलके कपडे घालायचे. त्यावेळी त्यांचे कपडे टी शर्ट सारखे होते. त्यावेळी त्या सैनिकांच्या कपड्यांना ट्रेनिंग शर्ट असे म्हंटले जायचे. त्यानंतर या हलक्या कपड्याला आणि छोट्या शर्टला टी-शर्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

अंडर-शर्टनंतर, टी-शर्टला यूएस नेव्हीच्या गणवेशाचा एक भाग बनवले गेले. कोका कोला कंपनीने हा टी-शर्ट प्रथम ब्रँड प्रमोशनसाठी वापरला आणि तेव्हापासून लोक ‘अंडर शर्ट’ ऐवजी टी-शर्ट घालू लागले.

2019 मध्ये इंडेक्सबॉक्सच्या संशोधनानुसार, चीनमध्ये बहुतेक लोक टी-शर्ट घालतात. यानंतर अमेरिका आणि भारतातील लोक सर्वात जास्त टी-शर्ट घालतात.