शरीरामध्ये अनेक अवयव असतात व या अवयवांच्या निरोगीपणावर शरीराचे आरोग्य अवलंबून असते. परंतु बऱ्याचदा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा इतर काही गोष्टींमध्ये या अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते व त्याचा विपरीत परिणाम हा संपूर्ण आरोग्यावर दिसून येतो.
कधी कधी तर असे होणारे विपरीत परिणाम जीवावर देखील बेततात. शरीरामधील असलेले प्रमुख अवयव पाहिले तर यामध्ये यकृत अर्थात लिव्हर, फुफ्फुस तसेच हृदय आणि किडनी यासारखे अवयव खूप महत्त्वाचे आहेत. एकंदरीत पाहिले तर या अवयवांच्या निरोगीपणावरच शरीराचे सर्व कार्यक्षमता अवलंबून असते.
या अवयवांपैकी जर आपण यकृत अर्थात लिव्हर पाहिले तर शरीरातील पचनसंस्थेशी संबंधित महत्वाचे कामे असतात ती लिव्हरच्या माध्यमातून पार पडत असतात. लिव्हर मध्ये पित्त तयार होते व या पित्ताच्या माध्यमातूनच खाल्लेले अन्न पचण्यास मदत होत असते.
हा एक शरीरातील खूप महत्त्वाचा अवयव असून या व याची काळजी घेणे देखील तितकच गरजेचे आहे. आपल्याला माहित आहे की जे व्यक्ती दारू पितात अशा लोकांना लिव्हरची संबंधित अनेक समस्या उद्भवतात व कधीकधी त्यांचे लिव्हर निकामी देखील होते.
परंतु असे अनेक व्यक्ती आपल्याला दिसून येतात की ते कधी दारूचे सेवन करत नाहीत. परंतु त्यांचे देखील लिव्हर खराब होऊ शकते. तेव्हा व्यक्तीला प्रश्न पडतो की दारू न पिता देखील लिव्हर कसं काय खराब झाले किंवा समस्या कशा काय निर्माण झाल्या?
परंतु यामधील प्रमुख कारण म्हणजे लिव्हर दारू किंवा मदयपान केल्यानेच खराब होते असे नव्हे तर ते बाहेरील काही ठराविक पदार्थ खाल्ले तरी होऊ शकते. त्यामुळे या लेखात आपण असे नेमके कोणते पदार्थ आहेत की ते खाल्ल्याने लिव्हर खराब होऊ शकते याबद्दलची माहिती घेऊ.
दारूच नाही तर हे पदार्थ खाल्ल्याने देखील लिव्हर होते खराब
1- जास्त फॅट्स असलेले पदार्थ- सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच जणांना बाहेरील पदार्थ खाण्याची सवय पडते. परंतु यामध्ये जर आपण हार्वर्ड हेल्थचा अहवाल पाहिला तर त्या नुसार तळलेले पदार्थ तसेच जंक फूड आणि गोड पदार्थ हे लिव्हर साठी खूप घातक आहे.
या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केले तर शरीरामध्ये चरबी जमा होते व त्याचा विपरीत परिणाम लिव्हरवर होत असतो. त्यामुळे लिव्हर जर तुम्हाला निरोगी ठेवायचे असेल तर फॅट्स फ्री म्हणजेच फॅट्स नसलेला आहार घेणे गरजेचे आहे.
2- साखरेचे सेवन- बऱ्याच व्यक्तींना जास्त गोड खाण्याची सवय असते किंवा गोड पदार्थ जास्त आवडतात. परंतु अशा पद्धतीने जर जास्त गोड खाल्ले तरी देखील शरीरात साखरेचे प्रमाण वाढते व त्याचे प्रमाण वाढल्याने मधुमेह होऊ शकतो व मधुमेह झाल्याने लिव्हरवर त्याचा थेट परिणाम होतो.
3- प्रोसेस्ड फूड- सध्याच्या धावपळीच्या जीवनात बरेच व्यक्ती प्रोसेस्ड फूड खायला पसंती देतात व झटपट जेवण बनवून पोटामध्ये ढकलतात. परंतु अशा पद्धतीचे जेवण बनवण्याचा शॉर्टकट मात्र आपल्या लाईफ वर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे प्रोसेस्ड फूड खाणे टाळणे फायद्याचे ठरते.