Low blood pressure : आजच्या या धावपळीच्या काळात रक्तदाबाची समस्या सामान्य बनली आहे. अनेक लोकांना रक्तदाबाचा त्रास असल्याचे आपण दररोज ऐकतो. रक्तदाब कमी असला तरी समस्या असते आणि जास्त असला तरी देखील समस्या असते. जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा लोकांना चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे, हात-पाय थंड होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
दरम्यान जर तुम्हालाही कमी रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करून लगेचच यातून बाहेर पडू शकता. आज तुमच्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय घेऊन आलो आहोत, जे केल्यास तुम्हाला कमी रक्तदाबाच्या समस्येवर मात करता येईल. चला तर मग हे उपाय एक एक करून जाणून घेऊया.
मीठ
जर तुमचा रक्तदाब कमी असेल (लो ब्लड प्रेशर) तर तुमच्या तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण वाढवा. ज्यामुळे तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या होणार नाही. तसेच, कमी रक्तदाब टाळण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्यात मीठ मिसळून पिऊ शकता. हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
शरीर हायड्रेटेड ठेवा
कमी रक्तदाब असलेल्या लोकांना त्यांचे शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी लोकांनी दिवसभरात सुमारे 8 ग्लास पाणी प्यावे. जर तुम्ही तुमचे शरीर हायड्रेट ठेवले तर कमी रक्तदाबाची समस्या कमी होईल. तुम्ही सतत पाणी पित राहणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला कमी रक्तदाबाच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.
एलेक्ट्राल प्या
जर तुमचा रक्तदाब कमी राहिला तर तुम्ही Elektral घेऊ शकता. हे प्यायल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहील. एलेक्ट्राल नसेल तर मीठ आणि साखरेचा द्रावण तयार करून प्यावे. याचे सेवन केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहील. एलेक्ट्राल तुम्हाला मेडिकल मध्ये सहज मिळून जाईल.
पौष्टिक अन्न
कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करावा. याच्या सेवनाने तुमचा रक्तदाब सामान्य राहील. यासाठी तुम्ही पालक, मुळा, पपई, केळी, मखणा यांसारख्या पौष्टिक आहाराचा समावेश करू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या आहारात हंगामी फळांचाही समावेश करू शकता.