Low Budget Visit Srilanka And Nepal : तुम्हालाही फिरायची आवड असेल तर तुम्हीही तुमचे विदेशात फिरायला जाणायचे स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण करू शकता. भारताशेजारील देशांमध्ये तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये फिरू शकता.
भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. मात्र अनेकांना विदेशातील पर्यटन स्थळे पाहण्याची आवड असते. आपल्या देशातील आणि दुसऱ्या देशातील पर्यटन स्थळांमध्ये बराच फरक आहे. तुम्ही हे अनेकदा सोशल मीडियावर देखील पाहिले असेल.
विदेशातील पर्यटन स्थळांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून अनेकांना फिरायला जाण्याचा मोह आवरता येत नाही मात्र पैसे जास्त खर्च होतील म्हणून अनेकजण फिरायला जाणे टाळत असतात.
पण जर तुम्हाला विदेशात म्हणजे भारताशेजारील देशामध्ये फिरायचे असेल तर तुम्ही सहज फिरू शकता. श्रीलंका आणि नेपाळ हे दोन देश फिरण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज नाही. हे दोन देश तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये फिरू शकता.
श्रीलंका आणि नेपाळला जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा काढण्याची गरज नाही. तुम्ही विना पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय या दोन देशांमध्ये फिरू शकता. त्यामुळे तुमच्या पैशांची येथे देखील बचत होत आहे. चला तर जाणून घेऊया हे दोन देश फिरण्यासाठी किती खर्च येईल.
नेपाळ
जर तुम्हाला नैसर्गिक वातावरणात फिरायचे असेल तर तुमच्यासाठी नेपाळ हा देश सर्वोत्तम आहे. या देशामध्ये तुम्ही सहज भारतामधून जाऊ शकता. या देशामध्ये तुम्ही घनदाट जंगले आणि हिमालय पर्वतांच्या रांगा पाहू शकता. नेपाळ हिमालय पर्वतांच्या मधोमध वसलेला देश आहे.
नेपाळमध्ये तुम्ही पर्वत शिखरे, नैसर्गिक सौंदर्य आणि मठ पाहू शकता. तुम्हाला कॅम्पिंग आणि ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही नेपाळला नक्कीच भेट द्या. जर तुम्हाला या ठिकाणी 4 दिवसांच्या सहलीसाठी जायचे असेल तर तुम्हाला 25,000 रुपयांचा खर्च येईल.
नेपाळमधील पाहण्यासारखी ठिकाणे
पशुपती नाथ मंदिर, बर्दिया नॅशनल पार्क, पाटण बोघनाथ स्तूप आणि गार्डन ऑफ ड्रीम्स.
खाद्यपदार्थ
येथील आंबा, मोमो, गुंड्रुक धिडो, आलू तमा, यमारी आणि चाटमारी हे खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत.
श्रीलंका
तुम्हालाही भारताशेजारील देशामध्ये म्हणजेच श्रीलंकेमध्ये फिरायला जायचे असेल तर तुम्ही सहज जाऊ शकता. या देशामध्ये फिरायला जाण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. श्रीलंकेमध्ये तुम्ही जंगल आणि समुद्रकिनारी फिरू शकता. तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांना देखील भेट देऊ शकता.
तुम्हाला श्रीलंकेमध्ये दिवसांच्या सहलीसाठी जायचे असेल तर प्रति व्यक्ती ७ हजार रुपयांचा खर्च येईल. त्यामुळे तुम्ही कमी पैशांमध्ये विदेशात जायचे स्वप्न पूर्ण करू शकता. या ठिकाणच्या खाद्यपदार्थाचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता.
श्रीलंकेतील पाहण्यासारखी ठिकाणे
श्रीलंकेमध्ये तुम्ही यापुहवा रॉक फोर्ट, जाफना किल्ला, श्री महा बोधी, सिगिरिया रॉक फोर्टला भेट देऊ शकता.
श्रीलंकेमधील लोकप्रिय खाद्यपदार्थ
कोट्टू रोटी, लॅम्परे, डाळ करी, अप्पा आणि दूध भात हे इथले सर्वात आवडते खाद्यपदार्थ आहेत.