Chamomile Flower : जर तुम्हाला बिझनेसच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावून सेट व्हायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त बिझनेस आयडिया देत आहोत. हा व्यवसाय असा आहे ज्याला तुम्ही जादुई व्यवसायही म्हणू शकता.
म्हणजेच यात नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते. आपण या ठिकाणी जादुई फुले अर्थात कॅमोमाइल फुले (Chamomile Flower) यांबद्दल माहिती पाहणार आहोत.
हे मॅजिक फ्लॉवर म्हणजेच कॅमोमाईल फ्लॉवर म्हणून ओळखले जाते. या फुलांपासून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधे बनवली जातात. त्यामुळे खासगी कंपन्यांमध्ये या फुलांना मोठी मागणी आहे. कॅमोमाइल निकोटीन मुक्त आहे.
पोटाशी संबंधित आजारांवर हा रामबाण उपाय आहे. या फुलांचा उपयोग ब्यूटी प्रोडक्ट बनवण्यासाठी केला जातो. आयुर्वेद कंपनीत या फुलांची मागणी जास्त असल्याचे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कॅमोमाइल फुलांचे उत्पादन आणि कमाई
या फुलांची लागवड करून शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात. एका एकरात 5 क्विंटल फुलांचे उत्पादन मिळते. तर एक हेक्टरमध्ये सुमारे 12 क्विंटल कॅमोमाइल फुलांचे उत्पादन घेतले जाते. याची किंमत 10 ते 12 हजार रुपयांच्या आसपास आहे. खर्चाच्या 5-6 पट नफा कमावू शकता. हे पीक सहा महिन्यांत तयार होते. म्हणजेच शेतकऱ्यांना 6 महिन्यात लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.
कॅमोमाइल फुलाचे फायदे
ही फुले वाळल्यानंतर त्यांचाच चहाही बनवून पिला जातो. त्याच्या चहामुळे अल्सर आणि मधुमेहासारख्या आजारांपासून आराम मिळतो. त्वचेच्या आजारांवरही कॅमोमाइल खूप फायदेशीर आहे. जलन, झोप न येणे, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा यावर हे खूप फायदेशीर आहे. याच्या फुलांचा उपयोग जखमा, घाव, पित्त आणि पोटाचे आजार बरे करण्यासाठी केला जातो.