लाईफस्टाईल

Margi Shani : शनीमुळे मिथुन, कन्या आणि तूळ राशीत वाढणार अडचणी, तर ‘या’ राशींना होणार फायदा !

Published by
Ahmednagarlive24 Office

Margi Shani : ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्व आहे. शनी जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. शनीच नाव घेताच बरेचजण चिंतेत येतात. बहुतेक लोकांना असे वाटते की शनि त्यांचे नुकसान करेल. मात्र, तसे नाही,  शनीची हालचाल किंवा शनीच्या हालचालीतील बदल यासारखी कोणतीही ज्योतिषीय घटना काही राशींसाठी चिंताजनक असू शकते पण काही राशींसाठी फलदायी देखील असते.

दरम्यान, 4 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा शनि आपली चाल बदलणार आहे. शनी मार्गी होणार आहे. अशा परिस्थितीत त्याचा कोणत्या राशीवर काय परिणाम दिसून येईल ते आज आपण जाणून घेणार आहोत.

मेष

मनात अशांतता असू शकते. मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतात, शक्यतो असे विचार टाळा. या काळात फक्त तुमच्या आरोग्याची काळजी नाही तर तुमच्या कुटुंबाचीही काळजी घ्या. कामानिमित्त परदेशात जावे लागू शकते. ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

वृषभ

शनीच्या राशीत होणाऱ्या बदलांमुळे मन निराश आणि असमाधानी राहील. नोकरीतही बदल होऊ शकतात. मात्र, कामाची व्याप्ती वाढू शकते. नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. हा काळ काहीतरी नवीन खरेदी करण्याचा आहे.

मिथुन

विचारांनी मनाला त्रास होईल. या काळात आत्मविश्वास कमी होऊ शकतो. बांधकामात आनंद मिळू शकेल. कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल पण धांदल असेल.

कर्क

तुम्हाला मनःशांती मिळेल पण तुम्ही आळशीपणाचे बळी ठरू शकता. नोकरीत बढती किंवा बदल होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल.

सिंह

या काळात धीर धरावा लागेल अस्वस्थ राहील. वाईट विचार सोडा. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल. धार्मिक कार्यात मन लावल्याने परिस्थिती सुधारेल.

कन्या

तुम्हाला तणाव वाटू शकतो, तणाव न घेता शांत राहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या कार्यक्षेत्रावर अधिक लक्ष द्या. या काळात काहीतरी चांगली बातमी मिळू शकते.

तूळ

मनात अशांतता राहील. मन अनियंत्रित राहिल्यास वादविवादात अडकू शकते. अभ्यास करणाऱ्या मुलांना काही अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सदैव सतर्क राहणे आवश्यक आहे.

वृश्चिक

या राशीचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील परंतु त्यांचे मन चंचल राहील. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवा आणि खर्चावर कडक नियंत्रण ठेवा.

धनु

तुम्ही नोकरीसाठी परीक्षा किंवा मुलाखत दिली असेल तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. या काळात मान-सन्मानही वाढेल. तसेच या काळात कुटूंब आनंदी राहील.

मकर

तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकता. हे टाळण्यासाठी कुटुंबासह धार्मिक प्रवासाला जा. तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. या काळात काळजी घेण्याची विशेष गरज आहे.

कुंभ

कामाच्या ठिकाणी वाढ किंवा बदल होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, तरीही तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल.

मीन

छोट्या-छोट्या गोष्टींवरून तुम्हाला राग येऊ शकतो. मनावर नियंत्रण ठेवा. खर्च वाढतील पण उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. कामाकडे विशेष लक्ष द्या.

Ahmednagarlive24 Office